शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan : राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले, "२० वर्षांत मिळवलेलं सहजतेनं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:04 IST

Afghanistan Taliban : तालिबाननं अफगाणिस्तानमधील जवळपास ५० टक्के प्रांतीय राजधानींवर मिळवला ताबा. गुरूवारी त्यांनी देशातील दुसऱ्या, तिसऱ्या मोठ्या शहरावर केला होता हल्ला.

ठळक मुद्देतालिबाननं अफगाणिस्तानमधील जवळपास ५० टक्के प्रांतीय राजधानींवर मिळवला ताबा. गुरूवारी त्यांनी देशातील दुसऱ्या, तिसऱ्या मोठ्या शहरावर केला होता हल्ला.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती अस्थिर होत चालली आहे. अमेरिकन लष्करानं अफगाणिस्तानमधून आपलं सैन्य परत बोलावण्यास सुरूवात केल्यानंतर तालिबाननं पुन्हा एकदा अफगाणिस्तावर ताबा मिळवण्यास सुरूवात केली आहे. तालिबाननं तब्बल ५० टक्के प्रांतीय राजधानींवर ताबा मिळवला आहे. याच दरम्यान, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशाला संबोधित केलं. अफगाण सरकार आणि तालिबानदरम्यान गेल्या मोठ्या कालावधीपासून सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान हे संबोधन हे महत्त्वाचं वळण ठरू शकतं. 

यापूर्वी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशरफ गनी यांनी आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा संदेश रेकॉर्ड केल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच तो कोणत्याही क्षणी जारी केला जाणार असल्याचंही म्हटलं होतं. परंतु अशरफ गनी यांच्या संबोधनानंतर यावर पूर्णविराम लागला आहे. गुरूवारी ही लढाई तालिबानच्या पक्षात जाताना दिसत होती. तालिबाननं गुरूवारी अफगाणिस्तानातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरावर ताबा मिळवला होता.काय म्हणाले गनी?अशरफ गनी यांनी यावेळी सशस्त्र दलांच्या पुनर्बांधणीला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं आहे. "राष्ट्राध्यक्ष म्हणून अस्थिरता, हिंसाचार आणि देशातील नागरिकांचं स्थलांतर रोखण्यावर माझं लक्ष्य आहे," असं गनी जनतेला संबोधित करताना म्हणाले. "हत्यांचं प्रमाण वाढण्यापासून रोखणं, २० वर्षांपासून जे मिळवलंय त्याचं नुकसान होण्यापासून वाचवणं, विनाश आणि सतत असलेली अस्थिरता थांबवण्यासाठी अफगाणी लोकांवर जबरदस्ती थोपवण्यात आलेल्या युद्धाला मंजुरी देणार नाही. सध्याच्या स्थितीबाबत स्थानिक नेते आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसह चर्चा सुरू आहे,"असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

काबुल संदर्भात चिंतातालिबानने अफगाणिस्तानमध्ये पुढे जात दक्षिण अफगाणिस्तानातील कंदाहार, हेल्मंडसह आणखी चार शहरे ताब्यात घेतली. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने अनेक मोठी शहरं ताब्यात घेतल्याने आता काबुलसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानी सैन्य राजधानी काबूलकडे कूच करीत असून काही दिवसांमध्ये तालिबान राजधानीचं शहर काबूलही ताब्यात घेईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. कंदाहारवर तालिबानने ताबा मिळवल्याच्या वृत्ताला सरकारी अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिकाwarयुद्ध