अफगाणिस्तानमध्ये झालेल्या 2 हल्यांत 21 जणांचा मृत्यू
By Admin | Updated: February 27, 2016 19:08 IST2016-02-27T19:08:12+5:302016-02-27T19:08:12+5:30
अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्यांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. काबुल आणि कुनरमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या 2 हल्यांत 21 जणांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत -
काबुल, दि. 27 - अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्यांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाला आहे. काबुल आणि कुनरमध्ये हा हल्ला करण्यात आला आहे. पहिला हल्ला राजधानी काबुलमध्ये करण्यात आला . काबुलमधील संरक्षण मंत्रालयाजववळ आत्मघाची हल्ला करण्यात आला आहे. या हल्यात 12 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार मृतांपैकी 10 जण हे सामान्य लोक असून 8 जण जखमी झाले आहेत. तालिबानने या हल्याची जबाबदारी घेतली आहे. हा हल्ला झाला तेव्हा कार्यालय बंद झाले होते. तर दुसरीकडे कुनरमध्ये मार्केट परिसरात झालेल्या हल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. एका मोटरसायकलमध्ये डिटोनेटरच्या सहाय्याने स्फोट घडवून हा हल्ला करण्या आला.
कुनरमध्ये झालेल्या हल्यात आदिवासी नेता हाजी खान यांचाही मृत्यू झाला आहे. हाजी खान तालिबानी दहशतवाद्यांविरोधात लढत होते. त्यासाठी लोकांना एकत्र करत होत. हाजी खान यांना ठार करण्यासाठीच हा हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रपती अशरफ गनी यांनी लोकांची हत्या करणा-या कोणत्याही गटाशी चर्चैला नकार दिला आहे.