शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

अफगाणी देशभक्ताने असा वाचविला ऐतिहासिक सुवर्ण खजिना

By admin | Updated: March 22, 2016 03:13 IST

अफगाणिस्तानच्या उत्तरेला हिंदुकुश पर्वत आणि अमू दर्या सरोवराच्या काठावर शेबरघन हे छोटेसे शहर वसले आहे. प्राचीन काळी भारत आणि चीनमधून युरोपशी होणाऱ्या ‘सिल्क रुट’ या व्यापारी मार्गावर असल्या

सोपान पांढरीपांडे, नवी दिल्लीअफगाणिस्तानच्या उत्तरेला हिंदुकुश पर्वत आणि अमू दर्या सरोवराच्या काठावर शेबरघन हे छोटेसे शहर वसले आहे. प्राचीन काळी भारत आणि चीनमधून युरोपशी होणाऱ्या ‘सिल्क रुट’ या व्यापारी मार्गावर असल्याने हे शहर एक सुपीक व धनाढ्य शहर म्हणून प्रसिद्ध होते. या प्रदेशाला त्याकाळी ग्रीक व्यापाऱ्यांनी ‘बॅक्ट्रिया’ असे नाव दिले होते. अलेक्झांडर द ग्रेटच्या मृत्यूनंतर (ख्रि.पू. ३२३ इसवी) ग्रीकांचा प्रभाव कमी झाला व हळूहळू शेबरघन शहराचे महत्त्वही ओसरले.परंतु गत वैभवाच्या खुणा सांगणारा एक उंचवटा मात्र शेबरघनच्या जवळ तेवढा शिल्लक राहिला. १० फूट उंच आणि १०० मीटर लांब/रुंद या उंचवट्याला स्थानिक लोक ‘तिल्या तेप’ म्हणजे ‘सोन्याचा डोंगर’ म्हणत. पण त्यात काय दडले आहे हे मात्र जवळपास २००० वर्षे गुलदस्त्यात राहिले. १९७० च्या दशकात जन्माने ग्रीक-रशियन असलेल्या व्हिक्टर सेरियानिदीस या पुरातत्व शास्त्रज्ञाचे या उंचवट्याकडे लक्ष गेले व उत्खनन सुरू झाले. दोन वर्षाच्या उत्खननानंतर सेरियानिदीसला ‘तिल्या तेप’ मध्ये कुशान या भटक्या व्यापारी जमातीच्या सहा कबरी सापडल्या. त्यातूनच जवळपास २१,००० सोन्याच्या कलात्मक वस्तू व दागिन्यांचा खजिना कबरी उघडल्यावर सापडला. हा सर्व खजिना १९७९ मध्ये सूचीबद्ध करून अफगाणिस्तानच्या नॅशनल म्युझियमकडे सोपवण्यात आला व त्यानंतर तो अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेकडे सुपूर्द करण्यात आला.या खजिन्यात सोन्याच्या कलात्मक वस्तू म्हणजे मुकुट, मूर्ती, नाणी, कंठ्या, माळा, सोन्याने मढवलेली वस्त्र प्रावरणे इ. आहेत. मोठ्या आकाराच्या १२ लोखंडी पेट्यांमध्ये भरलेला हा खजिना अफगाणिस्तान सेंट्रल बँकेत एका तळघरात ठेवला आहे. एका अंदाजानुसार हा एकूण सुवर्णसाठा ४० टन आहे. १९८० मध्ये रशियन सैन्याने अफगाणिस्तानवर चढाई केली व नंतरची २० वर्षे हा देश रशियन आणि नंतर तालिबानी राजवटीमुळे अस्थिर झाला. परंतु बॅक्ट्रियन गोल्ड मात्र अफगाणिस्तान सेंट्रल बँकेच्या तळघरात सुरक्षित राहिले. १९८९ मध्ये हा खजिना रशियन सैन्याने लुटून नेला अशी अफवा पसरली तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह यांनी विदेशी राजदूतांना हा खजिना दाखवलाही होता. २००१ साली तालिबान अतिरेक्यांना हुसकून लावण्यासाठी अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तावर चढाई केली व तालिबान सैन्याचा पाडाव केला. त्यावेळी काबूल सोडण्यापूर्वी बॅक्ट्रियन गोल्डचा खजिना सोबत न्यावा म्हणून तालिबान नेत्यांनी तळघराचे कुलूप उघडण्याचे फर्मान अस्करझईला सोडले. पण फसलेल्या किल्लीच्या तुकड्यामुळे त्याला कुलूप उघडता आले नाही. शेवटी अमेरिकन सैन्य जवळ येत आहे हे बघून तालिबान नेत्यांनी तळघर न उघडताच पळ काढला व बॅक्ट्रियन गोल्डचा खजिना अफगाणिस्तान बँकेत सुरक्षित राहिला. पण जाता जाता त्यांनी अस्करझईला मात्र तुरुंगात डांबले.लवकरच अफगाणिस्तान देश स्वतंत्र झाला व हमीद करझई यांनी सत्ता ताब्यात घेतली. त्यांनीच अस्करझईची सुटका केली व त्याने घडलेला सगळा प्रकार करझर्इंना सांगितला. पण तालिबान अतिरेकी बदला घेतील या भीतीने हा सर्व प्रकार बरीच वर्षे गुप्त ठेवण्यात आला.२00८ साली अफगाणिस्तान सरकारने अमीरुद्दीन अस्करझईचा राष्ट्रीय सत्कार करून सन्मानित केले त्यावेळी बॅक्ट्रियन गोल्ड खजिन्याची ही सुरस कथा जगाला कळली. आता अस्करझई सेवानिवृत्त झाला आहे व बॅक्ट्रियन गोल्ड अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेच्या तळघरात आजही सुरक्षित आहे. अफगाणिस्तानचा राष्ट्रीय सुवर्ण साठा म्हणून बॅक्ट्रियन गोल्ड आज ओळखले जाते.> १९९० नंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान अतिरेक्यांची राजवट सुरू झाली. १९९६ च्या मध्यात तालिबान नेत्यांना हा खजिना सुरक्षित आहे की नाही अशी शंका आली तेव्हा त्यांनी सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांना हा खजिना दाखवण्यासाठी आदेश दिला. त्यावेळी अमीरुद्दीन अस्करझई हा अधिकारी बॅक्ट्रियन गोल्डच्या तळघराचा सुरक्षा रक्षक होता. > हा खजिना किमान तालिबान सैन्याच्या हाती लागू नये या हेतूने त्याने तळघराच्या कुलुपाची किल्ली एवढ्या जोराने फिरवली की किल्लीचा एक तुकडा तुटून तो कुलुपात फसून बसला.हे एवढे अचानक घडले की तालिबान नेत्यांच्या ते लक्षातही आले नाही व अस्करझईच यांचे धाडस त्याच्या अंगलट आले नाही.> त्याला तालिबानी नेत्यांच्या हेतूबद्दल शंका आली पण ती बाजूला ठेवून अस्करझईने तळघराचे कुलूप उघडले व तालिबानी नेत्यांना हा खजिना दाखवला. तालिबानी नेत्यांचे समाधान झाल्यावर त्यांनी अस्करझईला पुन्हा तळघर बंद करण्याचा आदेश दिला.