अफगाण लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ८ ठार
By Admin | Updated: December 4, 2015 18:36 IST2015-12-04T18:36:28+5:302015-12-04T18:36:28+5:30
लष्कराचे जवान आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ जण ठार झाले असून, दोन जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अधिका-यांने दिली.

अफगाण लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ८ ठार
ऑनलाईन लोकमत
काबूल, दि. ४ - पूर्व काबूलमध्ये लष्कराचे जवान आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आठ जण ठार झाले असून, दोन जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या अधिका-यांने दिली.
सय्यद अबाद जिल्ह्यात मशिदीसमोर ही चकमक झाल्याची माहिती वारडाक प्रांताचे पोलिस प्रमुख खलील अंद्राबी यांनी दिली. या चकमकीत नागरीक, जवान कि, दहशतवादी ठार झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.