शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

'घरातून बाहेर पडू नका...'; 'या' देशातील भारतीय लोकांसाठी सरकारने जारी केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 18:01 IST

Advisory for Indians: भारत सरकारला असे आवाहन का करावे लागले, जाणून घ्या कारण

Advisory for Indians: आरक्षण हा मुद्दा सध्या भारतात सातत्याने चर्चेत आहे. त्यासाठी विविध प्रकारची निदर्शने होत आहेत. आता शेजारी राष्ट्र असलेल्या बांगलादेशातही हा मुद्दा पोहोचला आहे. बांगलादेशात आरक्षणाविरोधात लोक रस्त्यावर उतरले असून आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पण तेथे परिस्थिती काहीशी वेगळी आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी बांगलादेशात गेल्या ४ दिवसांपासून हिंसक निदर्शने सुरू आहेत. आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या या आंदोलनात ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आंदोलकांनी आज संपूर्ण देशात बंदची हाक दिली आहे. या गोष्टीची तीव्रता पाहता भारतसरकारने ॲडव्हायझरी जारी केली आहे.

भारत सरकारची ॲडव्हायझरी

बांगलादेशातील परिस्थिती पाहता भारत सरकारने एक ॲडव्हायझरी जारी केली असून भारतीय लोकांना, विशेषतः विद्यार्थ्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. भारत सरकारने बांगलादेशात राहणाऱ्या भारतीयांना त्यांच्या घरातून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात राहण्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय आपत्कालीन क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

सत्ताधारी पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनांवर आरोप

बांगलादेशच्या रस्त्यावर एका बाजूला पोलीस आणि सत्ताधारी पक्ष अवामी लीगशी संबंधित विद्यार्थी संघटना आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाला विरोध करणारे आंदोलक आहेत. बांगलादेशातील आरक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या निदर्शकांनी सोमवारी ढाका आणि त्याच्या बाहेरील भागात शांततापूर्ण निदर्शने केल्याचा आरोप केला. त्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर लाठ्या, दगड आणि चाकूने हल्ला केल्याची माहिती आहे.

बांगलादेशातील सध्या आरक्षण कसे?

बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण ५६ टक्के आरक्षण आहे. त्यापैकी ३० टक्के आरक्षण हे १९७१ च्या युद्धातील बांगलादेशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी आणि कुटुंबांसाठी आहे. १० टक्के प्रशासकीय विभाग, १० टक्के महिला आणि ५ टक्के आरक्षण वांशिक अल्पसंख्याकांसाठी आहे. याशिवाय शारीरिकदृष्ट्या अपंगांनाही सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतGovernmentसरकार