शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 9:10 AM

Dr. Cyrus Poonawalla : काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला गेले होते लंडनमध्ये. त्यानंतर त्यांचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्यानं त्यांनी देश सोडल्याच्या रंगल्या होत्या चर्चा.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अदर पूनावाला गेले होते लंडनमध्ये.त्यानंतर त्यांचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्यानं त्यांनी देश सोडल्याच्या रंगल्या होत्या चर्चा.

काही दिवसापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला हे लंडनमध्ये गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि अदर पूनावाला याचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनला गेल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, त्यानंतर त्यांनी देश सोडल्याच्या चर्चा काही ठिकाणी सुरू होत्या. परंतु त्यांनी या चर्चांना फेटाळत यावर पूर्णविराम लावला आहे. लंडमध्ये द संडे एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. तसंच आपण गरमीच्या सुट्टीसाठी लंडनमध्ये आल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच दरवर्षी आपण असं करतो. संकटाच्या काळात आपल्यावर किंवा आपल्या मुलावर असे आरोप करणं खोटं आणि दुर्देवी असल्याचंही सायरस पूनावाला म्हणाले. "जेव्हापासून मला आठवणीत आहे तेव्हापासून मी मे महिना हा भारताच्या बाहेरच घालवला आहे. प्रत्येकाला गरमीची सुट्टी हवी असते. यावेळीही ती कोणती नवी गोष्ट नाही," असं सायरस पूनावाला म्हणाले. सायरस पूनावाला यांचे पुत्र अदर पूनावाला हे गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये आहेत. या ठिकाणी त्यांनी दिेलेल्या एका मुलाखतीत आपल्याला शक्तिशाली लोकांकडून धमकी मिळाल्याचं म्हटलं होतं. तसंच कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत होतं असंही त्यांनी म्हटलं होतं. सध्या सीरम इन्स्टिट्यूट भारतात कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करत आहे. यापूर्वी ३ मे रोजी आपल्या वक्तव्यात अदर पूनावाला यांनी एका रात्रीत लसीचं उत्पादन वाढवणं, त्यात तेजी आणणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. तसंच क्षमता वाढवण्यासाठी आपली कंपनी शक्य ते प्रयत्न करत आहे आणि ध्येय गाठण्यासाठी अधिकाधिक मेहनत केली जाईल असंही अदर पूनावाला म्हणाले होते. आपला लंडनमधील मुक्काम हा तात्पुरता आणि लवकरच आपण भारतात परतण्याच्या विचारात असल्याचं पूनावाला यांनी १ मे रोजी ट्विटरद्वारे सांगितलं होतं. सध्या त्यांचे वडिलही लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये जाणं ही आली नियमित बाब आहे. "अदर पूनावाला जेव्हा लहान होते तेव्हापासून त्यांना घेऊन आपण लंडनला येत होतो. आता त्यांची मुलं लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. हा एक नियमित प्रवास आहे. खरं पाहिलं तर आम्ही दरवर्षी डर्बीत जातो," असंही ते म्हणाले. नव्या योजनांवर विचारकंपनी युरोपमध्ये नव्या योजनांवर विचार करत आहे. कोरोनाच्या लसींचं उत्पादन भारतात सुरू आहे. आम्ही युरोपमध्ये काही कंपन्यांसोबत चर्चा करत आहोत. याबद्दल आत्ताच काही सांगणं घाईचं ठरणार असल्याचंही पूनावाला म्हणाले.

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाIndiaभारतLondonलंडनEnglandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्या