अभिनेत्री मल्लिका शेरावतवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2016 19:00 IST2016-11-17T18:57:35+5:302016-11-17T19:00:02+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यावर पॅरिसमध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.

अभिनेत्री मल्लिका शेरावतवर हल्ला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत हिच्यावर पॅरिसमध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री मल्लिका शेरावत हॉलिवूड चित्रपटामध्ये अभिनय करत असून सध्या ती पॅरिसमध्ये आहे. येथील तिच्या फ्लॅटमध्ये जात असताना तिच्यावर गेल्या शुक्रवारी (दि.11) तीन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.
चेहऱ्याला मास्क लावून आलेल्या या तीन हल्लेखोरांनी आधी मल्लिकावर अश्रूधुरांचा मारा केला आणि त्यानंतर तिला धक्का देत पळ काढला. या घटनेनंतर भयभीत झालेल्या मल्लिकाने इमर्जन्सी सर्व्हिसला पाचारण केले. दरम्यान, या घटनेचा तपास येथील पोलीस करत आहेत.
आधीही पॅरिसमध्ये ऑक्टोंबर महिन्यात रिऑलिटी स्टार किम कार्दशियन हिच्यावर सुद्धा असाच हल्ला झाला होता.