उबर कंपनीवर विवाहबाहय संबंध उघड केल्याचा आरोप
By Admin | Updated: February 13, 2017 12:03 IST2017-02-13T12:03:01+5:302017-02-13T12:03:01+5:30
आपले विवाहबाहय संबंध उघड झाल्याचा आरोप करीत फ्रान्सच्या रिविरा शहरात राहणा-या एका व्यावसायिकाने उबर कंपनीला न्यायालयात खेचले आहे.

उबर कंपनीवर विवाहबाहय संबंध उघड केल्याचा आरोप
ऑनलाइन लोकमत
रिविरा, दि. 13 - खासगी टॅक्सी सेवा देणा-या उबर कंपनीमुळे आपले विवाहबाहय संबंध उघड झाल्याचा आरोप करीत फ्रान्सच्या रिविरा शहरात राहणा-या एका व्यावसायिकाने उबर कंपनीला न्यायालयात खेचले आहे. त्याने उबरकडे 4 कोटी 80 लाख डॉलरची नुकसानभरपाई मागितली आहे.
या व्यावसायिकाने एकदा पत्नीच्या मोबाईलवरुन उबर टॅक्सी बुक केली होती. त्यानंतर उबरकडून सातत्याने अपडेटस पाठवले जायचे. त्यातून या इसमाची ट्रॅव्हल हिस्ट्री पत्नीला समजली आणि तिला विवाहबाहय प्रेमसंबंधांचा संशय आला. अधिक शोध घेतला असता व्यावसायिकाचे प्रेमसंबंध उघड झाले.
त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. उबर अॅपमुळे माझ्या अशीलाचे आयुष्य खराब झाले त्यामुळे त्याला नुकसान भरपाई देण्यात यावी असा युक्तीवाद वकिल डेविड अँड्री डारमॉन यांनी केला. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने उबरने काहीही प्रतिक्रिया दिली नाही पण क्लायंटची खासगी माहितीच्या संरक्षणाला पहिले प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे.