एमरजन्सी लँडिंग करताना तैवानयेथे विमानाला अपघात
By Admin | Updated: July 23, 2014 20:02 IST2014-07-23T20:02:04+5:302014-07-23T20:02:04+5:30
ट्रान्सएशिया एअरवेज या तैवान येथील स्थानिक विमान कंपनीच्या विमानाला अचानक एमरजन्सी लँडिंग करावी लागली

एमरजन्सी लँडिंग करताना तैवानयेथे विमानाला अपघात
ऑनलाइन टीम
मॅगाँग(तैवान), दि. २३ - ट्रान्सएशिया एअरवेज या तैवान येथील स्थानिक विमान कंपनीच्या विमानाला अचानक एमरजन्सी लँडिंग करावी लागली. मॅगाँग येथील विमानतळाजवळच एमरजन्सी लँडिंग करताना या विमानाला अपघात झाला आहे. त्यात ५१ जणांचा मृत्यू झाला असून सातजण जखमी झाले आहेत. या विमानात एकूण ५४ प्रवासी असून चार कर्मचारी होते. असे तैवानच्या प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. जीई २२२ हे विमान तैवानच्या पश्चिम किना-यावर असलेल्या पेन्घू आइसलँड इथे जात असताना हा अपघात झाला. स्थनिक अग्नीशामन दलाच्या कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान विमानतळावर पोहोचण्याआधीच काही किलोमिटर अंतरावर कोसळले. हे विमान कोसळण्याआधी त्याचा रडार सोबतचा संपर्क काही वेळेकरता तुटला असल्याचेही अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.