काठमांडू येथे टर्किश एअरलाइनच्या विमानाला अपघात
By Admin | Updated: March 4, 2015 16:45 IST2015-03-04T16:21:44+5:302015-03-04T16:45:37+5:30
काठमांडू येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळे अपघात झाला आहे.

काठमांडू येथे टर्किश एअरलाइनच्या विमानाला अपघात
ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि ४ - काठमांडू येथे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास टर्किश एअरलाइनच्या विमानाला धुक्यामुळे अपघात झाला आहे.
दाट धुक्यामुळेहे विमान दुस-यांदा धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी त्रिभुवनदास आंतरराष्ट्रीय विमानतळावर टर्किश एअरलाइनचे A330 हे विमान उतरत होते. धुक्यामुळे पहिल्या प्रयत्नात उतरणे धोकादायक असल्याने वैमानिकाने दुस-यांदा हे विमान धावपट्टीवर उतरवण्याचा प्रयत्न केला असता हा अपघात झाला असल्याचे नेपाळ नागरी हवाई उड्डाण प्राधिकरणाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे या A330 या विमानातील २३८ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात संरक्षण यंत्रणेला यश आले आहे. तसेच कोणत्याही प्रवाशाला गंभीर जखम झाली नसल्याचेही सुरक्षा यंत्रणांनी सांगितले आहे.