सौदी अरब सेनेच्या हॅलिकॉप्टरला अपघात
By Admin | Updated: February 17, 2015 16:11 IST2015-02-17T16:11:40+5:302015-02-17T16:11:40+5:30
सौदी अरब सेनेच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या अपघातात वैमानिकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील रक्षामंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराक व कुवेतच्या सीमेजवळ,

सौदी अरब सेनेच्या हॅलिकॉप्टरला अपघात
>ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. १७ - सौदी अरब सेनेच्या हॅलिकॉप्टरला झालेल्या अपघातात वैमानिकासह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
येथील रक्षामंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराक व कुवेतच्या सीमेजवळ, अल - बटीन येथे रात्रीच्या युद्ध सरवादरम्यान या हॅलिकॉप्टरला अपघात झाला आहे. ब्लॅक हॉक प्रकाराचे हे हॅलिकॉप्टर अमेरिकेत तयार करण्यात आले असून या अपघाताचे कारण रक्षा मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिलेले नाही. रक्षा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी अधिका-यांची समिती नेमून अपघाताचे कारण शोधण्यात येणार आहे. या अपघातात लेफ्टनंट कर्नल अल- अरफाज, फर्स्ट लेफ्टनंट माजिद अल - फिफीफी,लेफ्टनंट जैदी काब्लान आणि रईद अल - जहानी यांचा मृत्यू झाला आहे.