अबब ! जेवण 6 हजाराचं आणि टिप 83 हजारांची

By Admin | Updated: January 14, 2017 16:11 IST2017-01-14T13:01:55+5:302017-01-14T16:11:52+5:30

एका धनाढ्य व्यावसायिकाने भारतीय हॉटेलमध्ये जेवणांच्या सहा हजारांच्या बिलासोबत 83 हजारांची टीप दिली

Above! Meals 6 thousand and note 83 thousand | अबब ! जेवण 6 हजाराचं आणि टिप 83 हजारांची

अबब ! जेवण 6 हजाराचं आणि टिप 83 हजारांची

>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 14 - एका धनाढ्य व्यावसायिकाने भारतीय हॉटेलमध्ये जेवणाच्या सहा हजारांच्या बिलासोबत 83 हजारांची टिप दिली. विश्वास बसत नसेल ना...पण हे खरं आहे. पोर्टडाऊन येथील द इंडियन ट्री रेस्टॉरंटमधील कर्मचा-यांनी जेव्हा ही टिप पाहिली तेव्हा त्यांचाही काही वेळासाठी विश्वासच बसला नाही. या व्यवसायिकाने आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे. 
 
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या व्यवसायिकाने आपलं नाव जाहीर न करण्याची अट घालत आपण 2002 पासून आपण या रेस्टॉरंटमध्ये येत असल्याचं सांगितलं आहे. 'येथील शेफ बाबू यांच्या हातचं जेवण आपल्याला प्रचंड आवडतं. जेव्हा कधी मी घरी येतो तेव्हा त्यांच्या हातचं जेवण नक्की जेवतो', असं ते सांगतात.
 
'ते व्यवसायिक 2002 पासू बाबू यांचे ग्राहक आहेत. सध्या ते दुस-या देशात राहायला गेले असल्याने जेव्हा कधी घरी परत येतात तेव्हा फोन करुन बाबू आज जेवणासाठी काय करत आहेत याची माहिती घेतात. ते आधी इथे येतात आणि नंतर घरी जातात', असं रेस्टॉरंटच्या मालक लुना एकूश सांगतात. 'आमच्याकडील सर्व्हिस आणि जेवणावरुन सगळे खूश आहेत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, त्यादिवशी त्यांनी बाबू यांना बोलावलं आणि आपण एक छोटीशी गोष्ट देऊन तुमचे धन्यवाद मानत असल्याचं सांगितलं. आमच्या सर्वांचं लक्ष तिकडे गेलं, पण ही नक्कीच छोटी गोष्ट नव्हती', असं त्यांनी सांगितलं आहे. 
 
'आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. पण नंतर त्यांनी स्वत: मशीन घेऊन नंबर टाईप केला, आणि कार्डने पेमेंट केलं', अशी माहिती एकूश यांनी दिली आहे. यानंतर आता मला जेवणाचं बिल भरायचं आहे असं त्यांनी सांगितलं आणि सहा हजार रुपयांचं बिल भरलं. 
 

Web Title: Above! Meals 6 thousand and note 83 thousand