अबब... २ किमीच्या पिझ्झाची गिनीजबुक मध्ये नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 17:37 IST2016-05-19T17:37:49+5:302016-05-19T17:37:49+5:30
इटालीमध्ये नेपोलिटन पिझ्झाच्या स्वयंपाक्यांनी २ किमी लांबीचा पिझ्झा बनवला आहे. या पिझ्झाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.

अबब... २ किमीच्या पिझ्झाची गिनीजबुक मध्ये नोंद
>ऑनलाइन लोकमत
नॅपल्ज, दि. १९ - पिझ्झा हा जगातील एक लोकप्रिय इटालियन खाद्यपदार्थ आहे. पिझ्झा बनवण्यासाठी मैद्याच्या गोल लाटलेल्या पोळीवर टोमॅटो पेस्ट व चीझ फासून त्यावर विविध तर्हेची टॉपिंग्स कापून ठेवली जातात व भट्टीमध्ये भाजले जाते. अनेक प्रकारचे गरम गरम शाकाहारी, अन्डाहारी व मांसाहारी पिझ्झे जगभर बनवले जातात. अश्याच प्रकारे इटालीमध्ये नेपोलिटन पिझ्झाच्या स्वयंपाक्यांनी २ किमी लांबीचा पिझ्झा बनवला आहे. या पिझ्झाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. १८ मे रोजी नॅपल्ज या शहाराच्या समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या हायवे वर हा पिझ्झा बनवण्यात आला. २ किमीचा पिझ्झा बनवण्यासाठी सामानही प्रचंड प्रमाणात लागले.
२ किमीच्या पिझ्झासाठी २०० लिटर तेलाचा वापर करण्यात आला. २००० किलो मैदा वापरण्यात आला. २००० क्लो मैदा भारतात ऐखाद्या लग्नकार्यातत वापरला जातो. त्याचप्रमाणे १,६०० किलो टोमॅटोज् चा वापर करण्यात आला. २००० किलो इटालियन चीझचा वापर करण्यात आला.
तरुण पिढीत पिझ्झाचे आकर्षण प्रकर्षाने आढळते. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी नेपोलिटन पिझ्झाच्या कंपनीने ही अनोखी शक्कल लढवली असावी.