डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीशी विमानात गैरवर्तन
By Admin | Updated: December 23, 2016 14:55 IST2016-12-23T14:55:33+5:302016-12-23T14:55:33+5:30
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवान्का ट्रम्प विमान प्रवास करत असताना तिला एक वाईट अनुभव आला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीशी विमानात गैरवर्तन
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 23 - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवान्का ट्रम्प विमान प्रवास करत असताना तिला एक वाईट अनुभव आला. न्यूयॉर्कमधील जेएफके विमानतळावरुन जेटब्ल्यू एअरलाईन्सने प्रवास करत असताना, एका प्रवाशाने इवान्काला 'तुझे वडील देशाचा नाश करत आहेत' असं म्हणत आरडाओरडा करायला सुरुवात केली. यावेळी इवान्का तिच्या मुलांसोबत प्रवास करत होती. मात्र तिने आरडाओरडा करणा-या त्या प्रवाशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
यानंतर आणखी गोंधळ होऊ नये म्हणून विमान कंपनीच्या कर्मचा-यांनी त्या व्यक्तीला त्याच्या कुटुबीयांसोबत विमानाबाहेर काढले. दरम्यान, 'माझ्या पतीने डोनाल्ड ट्रम्पविरोधातील नाराजी शांतपणे मांडली' असे इवान्काला भर विमानात सुनावणा-या त्या व्यक्तीच्या पत्नीने सांगितले. तरीही कर्मचा-यांनी आम्हाला विमानाबाहेर काढले, असेही त्या महिलेने सांगितले.