शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाकिस्तानी चॅनेलनं पातळी सोडली; वर्ल्डकप जाहिरातीत 'अभिनंदन' यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 16:26 IST

पाकिस्तानी चॅनेलची आक्षेपार्ह जाहिरात

नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेत सहावेळा भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्ताननं पातळी सोडणारी जाहिरात तयार केली आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी हवाई दलासोबत झालेल्या चकमकीदरम्यान पाकिस्तानच्या ताब्यात सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांचा वापर जाहिरातीत करण्यात आला आहे. यंदाचा वर्ल्डकप आमचाच असेल, असा संदेश देणारी आक्षेपार्ह जाहिरात पाकिस्तानमधील वाहिनीनं तयार केली आहे. येत्या रविवारी (16 जून) भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत सहावेळा दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. मात्र सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. यानंतर आता 16 जूनच्या सामन्याआधी पाकिस्तानच्या एका वाहिनीनं एक आक्षेपार्ह जाहिरात तयार केली. यामध्ये विंग कमांडर अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दाखवण्यात आली आहे.27 फेब्रुवारीला अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात ते चहा पित असताना दिसत होते. याच व्हिडीओच्या धर्तीवर पाकिस्तानी वाहिनीनं एक जाहिरात तयार केली. यामध्ये अभिनंदन यांच्यासारखी दिसणारी एक व्यक्ती चहा पित आहे. त्या व्यक्तीची चौकशी सुरू आहे. टॉस जिंकल्यावर काय करणार, कोणत्या अकरा खेळाडूंना संधी मिळेल असे प्रश्न त्या व्यक्तीला विचारण्यात आले. 'मी हे तुम्हाला सांगू शकत नाही', अशी अभिनंदन यांनी दिलेली उत्तरं जाहिरातीमधील व्यक्तीनं दिली. यानंतर जाहिरातीमधील अभिनंदन यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला तिथून जाण्यास सांगितलं जातं. ती व्यक्ती चहाचा कप घेऊन तिथून जाऊ लागते. तितक्यात त्या व्यक्तीला कप घेऊन कुठे चाललास, असा प्रश्न विचारण्यात येतो. या ठिकाणी चहाच्या कपचा आधार घेत वर्ल्डकपवर भाष्य करण्यात आलं आहे. जाहिरात तयार करताना पाकिस्तानी वाहिनीनं पातळी सोडल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. 

टॅग्स :Abhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानICC World Cup 2019वर्ल्ड कप 2019