शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

५४ मुले आणि ६ बायका असलेल्या व्यक्तीचे निधन; मुलांनी मांडली व्यथा, सरकारवर केले आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 17:01 IST

५४ मुले आणि ६ बायका असलेल्या अब्दुल मजीद मंगल यांचे निधन झाले आहे.

नवी दिल्ली : ५४ मुले आणि ६ बायका असलेल्या अब्दुल मजीद मंगल यांचे निधन झाले आहे. ७५ वर्षीय मजीद यांना हृदयविकाराचा त्रास होता. ते पाकिस्तानातील नोश्की जिल्ह्यातील रहिवासी असून ट्रकचालक म्हणून काम करत होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी पहिले लग्न केले होते. खरं तर अब्दुल मजीद यांनी ६वेळा लग्न केले होते. यातील दोन पत्नींचे यापूर्वीच निधन झाले आहे. मजीद यांच्या ५४ मुलांपैकी १२ मुले देखील ते जिवंत असतानाच मरण पावली आहेत, तर ४२ मुले हृयात आहेत, ज्यामध्ये २२ मुले आणि २० मुली आहेत.

मशीद यांचा मुलगा शाह वली याने बीबीसीशी संवाद साधताना म्हटले, ५४ मुलांच्या गरजा भागवणे सोपे काम नव्हते, पण आमच्या वडिलांनी आयुष्यभर कष्ट केले होते. म्हातारपण असूनही त्यांनी मृत्यूच्या पाच दिवस आधीपर्यंत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाडी चालवली. मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवताना वडिलांना विश्रांती घेताना मी कधीही पाहिले नाही. ते सतत काही ना काही काम करत असे, असे शाह वली याने आणखी सांगितले.

मुलांनी मांडली व्यथा "आमच्यापैकी काहींनी बीएपर्यंत तर काहींनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले आहे. पण आम्हाला आता रोजगार नाही. आर्थिक चणचणीमुळे वडिलांवर योग्य उपचार होऊ शकले नाहीत. सरकारी मदतही मिळाली नाही. दुसरीकडे, भीषण पुरामुळे घर उद्ध्वस्त झाले. एकाच वेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते", असे मृत अब्दुल मजीद यांच्या मुलाने सांगितले.

जनगणनेमुळे मिळाली प्रसिद्धी अब्दुल मजीद मंगल आणि त्यांचे कुटुंब २०१७ मध्ये पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले, त्यावेळी पाकिस्तानात जनगणना सुरू होती. २०१७च्या जनगणनेपूर्वी क्वेटा शहरातील जान मोहम्मद खिलजी हा सर्वाधिक मुलांचा पिता असल्याचा दावा केला जात होता. त्याला ३६ मुले होती. मात्र या जनगणनेमुळे अब्दुल मजीद जगासमोर आले होते. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयPakistanपाकिस्तानDeathमृत्यू