जागतिक अर्थव्यवस्था बळकट करण्याची अॅबॉट यांची ग्वाही
By Admin | Updated: November 16, 2014 02:07 IST2014-11-16T02:07:26+5:302014-11-16T02:07:26+5:30
मुक्त व्यापारासोबत पायाभूत क्षेत्रत मोठी गुंतवणूक करण्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी जागतिक आर्थिक वृद्धीत 2 टक्क्यांची भर घालण्याची ग्वाही दिली.

जागतिक अर्थव्यवस्था बळकट करण्याची अॅबॉट यांची ग्वाही
ब्रिस्बेन : मुक्त व्यापारासोबत पायाभूत क्षेत्रत मोठी गुंतवणूक करण्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी जागतिक आर्थिक वृद्धीत 2 टक्क्यांची भर घालण्याची ग्वाही दिली. त्यासाठी जागतिक नेते 2 ट्रीलियन डॉलरचे (खर्व) योगदान देतील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
जागतिक आर्थिक वृद्धीला चालना देण्यासाठीच्या या योजनेमुळे आगामी पाच वर्षात लाखो रोजगार उपलब्ध होतील. शिवाय जागतिक वृद्धीत 2 टक्क्यांनी वाढ होईल, असेही त्यांनी दोन दिवसीय जी-2क् शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सांगितले. आम्हाला मुक्त व्यापार हवा आहे. पायाभूत क्षेत्रचा आणखी विकास करण्याची गरज आहे. तो आम्ही करू, हाच आमचा जगाला संदेश आहे, असेही ते म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेत जी-2क् देशांचा वाटा 85 टक्के आहे. (वृत्तसंस्था)