शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
3
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
4
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
5
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
6
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
7
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
8
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
9
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
10
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
11
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
12
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
13
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
14
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

जगातील सर्वात मोठा हिमखंड जागचा हलला, तीन दशके होता नुसताच उभा, आता वेगाने सरकू लागला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 5:43 AM

A23a Iceberg: तब्बल ३० वर्षे समुद्राच्या पाण्यावर नुसताच तरंगत असलेला महाकाय हिमखंड आता हळूहळू पुढे सरकायला लागला आहे. वेगाने मार्गक्रमण करीत ‘ए २३ ए’ नावाचा हा हिमखंड अंटार्क्टिकापासून लांब जात आहे. 

वॉशिंग्टन : तब्बल ३० वर्षे समुद्राच्या पाण्यावर नुसताच तरंगत असलेला महाकाय हिमखंड आता हळूहळू पुढे सरकायला लागला आहे. वेगाने मार्गक्रमण करीत ‘ए २३ ए’ नावाचा हा हिमखंड अंटार्क्टिकापासून लांब जात आहे. 

ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेचे रिमोट सेंसिंग तज्ज्ञ डॉ. ॲण्ड्र्यू फ्लेमिंग यांनी सांगितले की, चार दशकांआधी हा हिमखंड स्थिर झाला होता. तथापि, त्याचा आकार कमी झाल्याने त्याची पकड सैल होऊन तो हलायला लागला. तीन वर्षांआधी त्याची हालचाल बघितली. तापमानामुळे  ही हालचाल असेल, असे आधी वाटले होते. मात्र, तो पुढे जात असल्याचे लक्षात आले.

पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचाध्रुवीय क्षेत्रातील हिमखंड संपूर्ण पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अमेरिकेच्या वुड्स होल ओशिनोग्राफिक इन्स्टिट्यूशनच्या डॉ. कॅशरीन वॉकर यांच्यानुसार, अनेक अर्थाने हे हिमखंड जीवनदाते आहेत. अनेक जैविक हालचालींचे मूळ त्यांच्या अस्तित्वात आढळते. हिमखंड वितळल्यानंतर ते खनिज धूळ सोडतात ज्यामुळे सागरी खाद्य श्रृंखलेवर अवलंबून असलेल्या जीवांचे पोषण करतात.

कुठे चाललाय पर्वत?‘ए २३ ए’ कदाचित दक्षिण अटलांटिक समुद्राकडे जाण्याची शक्यता आहे. दक्षिण जॉर्जिया बेटावर प्रजनन करणाऱ्या लाखो सील, पेंग्विन आणि इतर समुद्री पक्ष्यांच्या आहारात तो हस्तक्षेप करण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञ त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

गती कशामुळे?n‘ए २३ ए’च्या सरकण्याची गती अलीकडेच पाण्याच्या हिंदोळ्यांत आलेली गती आणि वाऱ्याचा वेग यामुळे वाढलेली दिसते.nसध्या हा हिमखंड अंटार्क्टिकाच्या प्रायद्वीपाच्या उत्तरेकडील भागाकडून मार्गक्रमण करीत आहे.nसामान्य बोलीभाषेत ज्याचा उल्लेख ‘हिमशैल पथ’ असा करण्यात येतो, त्या अंटार्क्टिका सर्कम्पोलर करंटमध्ये ‘ए २३ ए’ सामावण्याची शक्यता आहे.

१९८६ मध्ये झाला अंटार्क्टिकापासून वेगळा४,००० स्क्वे. किमी. आकार लंडनपेक्षा दुप्पट४०० मीटर जाडी३० वर्षे अत्यंत कमी हालचाल२०२० पहिल्यांदा दिसली हालचाल 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयNatureनिसर्ग