शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दुबईची झाली डुबई! वर्षभराचा पाऊस झाला एकाच दिवसात; विमानतळ तुंबले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 05:12 IST

मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते.

दुबई : संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये मंगळवारी मुसळधार पाऊस झाल्याने रस्ते पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली तसेच विमानतळावर पाणीच पाणी झाले होते. तीव्र वादळामुळे दुबई विमानतळावरील उड्डाणे काही काळ थांबवण्यात आली होती. मोठा पूर आल्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र नंतर पाणी ओसरल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. 

पुरामुळे आणि आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रात्रभर पाऊस सुरू झाल्यानंतर जगातील सर्वात व्यस्त विमानतळावर उड्डाण विस्कळीत झाले. संध्याकाळपर्यंत, १२० मिलिमीटर पाऊस झाला. इतका पाऊस येथे एका वर्षात पडतो. पावसामुळे यूएईमधील शाळा मोठ्या प्रमाणात बंद होत्या आणि सरकारी कर्मचारी घरून काम करत होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

अरब राष्ट्रांना मुसळधार पावसाने झोडपले- दुबई (संयुक्त अरब अमिरात) : प्रामुख्याने वाळवंट प्रदेश असलेल्या संयुक्त अरब अमिरातसह शेजारील अरब राष्ट्रांमध्ये मंगळवारी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली, यामध्ये संयुक्त अरब अमिरात मधील अनेक प्रमुख महामार्ग जलमय झाले. - शेजारच्या ओमानमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या मोठ्या पुरात मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे आणि इतर अजूनही अनेक लोक बेपत्ता आहेत, असे देशाच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या राष्ट्रीय समितीने मंगळवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ज्यात एका प्रौढ व्यक्तीसह वाहनात सुमारे १० शाळकरी मुले वाहून गेल्याचा देखील समावेश आहे, या नैसर्गिक त्रासदीवर ओमानच्या राज्यकर्त्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. ओमानसह बहारीन, कतार आणि सौदी अरेबियातही मुसळधार पाऊस पडला आहे.

टॅग्स :DubaiदुबईRainपाऊस