शहरं
Join us  
Trending Stories
1
Narayan Rane : 'मी एका उपशाखा प्रमुखाला ठार मारणार होतो, बाळासाहेब ठाकरेंनी मला समजावलं म्हणून...'; नारायण राणेंनी सांगितला किस्सा
2
ट्रंप यांनी जाहीर केली सरकारी मदत घेणाऱ्या देशांची लिस्ट; त्यात भारताचे तीन शेजारी, भारताचे नाव आहे का?
3
खळबळजनक! नायजेरियात २२ भारतीय खलाशांना बेड्या; मालवाहू जहाजावर कोकेन सापडले...
4
धक्कादायक! अमेरिकेत भारतीय तरुणीचा खून करून प्रियकर भारतात पसार; पोलिसांना भेटून आला...
5
वंदे भारत एक्सप्रेस रुळावरून घसरण्याचा कट! रुळांवर लाकूड ठेवल्याचे आढळले; मोठा अपघात टळला
6
"मला खुश करणं गरजेचं, अन्यथा..."; रशियन तेलावरून डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा टॅरिफचा इशारा
7
बँक कर्मचारी संपावर जाणार, तीन दिवस व्यवहार होणार ठप्प; कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल?
8
धक्कादायक! ट्रंप यांची व्हेनेझुएलावर दुसऱ्या हल्ल्याची धमकी; आता कोलंबियाही रडारवर, दक्षिण अमेरिकेत युद्धाचे ढग?
9
भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?
10
आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
11
‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर
12
मुंबईत १० रुपयांत जेवण, ठाकरेंचा शब्द; महापालिका निवडणुकीसाठी वचननामा
13
“हिंदू आहोत, हिंदी नाही, इथल्या प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार”: राज ठाकरे
14
“विधानसभा अध्यक्षांना निलंबित करावे”; पदाचा दुरुपयोग केल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप
15
“वचननामा नव्हे ‘वाचून’नामा”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर खोचक टीका
16
“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार
17
“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप
18
राज्यातील प्रत्येक बसस्थानक-नगरपालिकेत पुस्तकांचे सवलतीत दुकान; DCM शिंदेंची साहित्य संमेलनात घोषणा
19
ठाण्यातून मराठी माणूस हद्दपार होतोय, मौनव्रत का? उद्धवसेनेचे नेते केदार दिघेंचा सवाल
20
बंडखोरी आटोक्यात; मात्र अपक्षांची डोकेदुखी कायम, ठाण्यात १३१ जागांसाठी ८६ अपक्ष रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ₹1530000000000000 चा खजिना अमेरिकेच्या घशात! व्हेनेझुएलावर ताबा मिळवल्यानंतर ट्रम्प यांनी कसं बदललं चित्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 14:30 IST

खरे तर, तेल हे व्हेनेझुएलासाठी नेहमीच त्याची शक्ती आणि कमकुवतपणाही राहिले आहे. आता अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील थेट नियंत्रणाचा जागतिक शक्ती संतुलनावरही मोठा परिणाम होईल. 

अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या लष्करी कारवाईमुळे जगाचे भू-राजकीय आणि आर्थिक चित्र पूर्णपणे बदलले आहे. व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा साठा आहे. हा साठा अंदाजे तब्बल ३०३ अब्ज बॅरल एवढा आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर, आता या प्रचंड संपत्तीवर अमेरिकेचे नियंत्रण येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तब्बल १७ ट्रिलियन डॉलर्सचा खजिना अमेरिकेच्या घशात - बिजनेस टुडेच्या वृत्तानुसार, "५७ डॉलर प्रति बॅरलनुसार, सध्या व्हेनेझुएलाच्या तेल साठ्याचे मूल्य अंदाजे १७.३ ट्रिलियन डॉलर्स (१५३० लाख कोटी रुपये) एवढे आहे. ही रक्कम अमेरिका आणि चीन वगळता जगातील कोणत्याही देशाच्या जीडीपीच्या तुलनेत  अधिक आहे. दरम्यान, आता अमेरिका व्हेनेझुएलाच्या तेल बाजारात मोठी गुंतवणूक करेल आणि हे तेल चीनसह जगातील इतर देशांना निर्यात करेल, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेमुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ उडाली आहे. कारण आता या खजिन्यावर अमेरिकेचा अघोषित कब्जा होईल.

आम्ही तेलाच्या व्यवसायात आहोत आणि ते जगाला विकू -शनिवारी पत्रकारपरिषदेत बोलतान  ट्रम्प म्हणाले, "अमेरिकन कंपन्या व्हेनेझुएलातील कोलमडलेल्या तेल पायाभूत सुविधा दुरुस्त करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. आम्ही तेलाच्या व्यवसायात आहोत आणि ते जगाला विकू." या निर्णयामुळे 'ओपेक' (OPEC) देशांचे वर्चस्व धोक्यात येऊ शकते आणि सौदी अरेबिया व रशियासारख्या प्रमुख तेल उत्पादक देशांच्या धोरणांना मोठा फटका बसू शकतो.

खरे तर, तेल हे व्हेनेझुएलासाठी नेहमीच त्याची शक्ती आणि कमकुवतपणाही राहिले आहे. आता अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील थेट नियंत्रणाचा जागतिक शक्ती संतुलनावरही मोठा परिणाम होईल.  

English
हिंदी सारांश
Web Title : US Seizes Venezuela, Claims $17 Trillion Oil Fortune: Trump's Plan

Web Summary : US military action in Venezuela grants control of its massive oil reserves, valued at $17 trillion. Trump aims to invest, export globally, disrupting OPEC and reshaping global energy markets with US dominance.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCrude Oilखनिज तेल