शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

एका उंदराने पुतिन यांचा पाठलाग केला होता, रशियाच्या अध्यक्षांनी सांगितला किस्सा; युक्रेन युद्धाचा संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 11:43 IST

युक्रेन आणि रशियामध्ये आता युद्धविरामच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या दरम्यान आता पुतिन यांचा २५ वर्षापूर्वीची एक मुलाखत व्हायरल झाली आहे.

मागील काही वर्षांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. पण, अजूनही यश मिळालेलं नाही. दरम्यान, आता युद्ध थांबवण्यासाठी तुर्कीने मध्यस्थी करण्याची ऑफर दिली, झेलेन्स्कीना आमंत्रण दिले, ट्रम्पने रस दाखवला पण, शेवटच्या क्षणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोघांनीही माघार घेतली. आता पुतिन यांच्याऐवजी फक्त रशियन शिष्टमंडळच चर्चेत सहभागी होईल. दरम्यान, पुतिन यांच्या २५ वर्षापूर्वीच्या एका जुन्या मुलाखतीची चर्चा सुरू आहे. 

यामध्ये त्यांनी एका घटनेचा उल्लेख केला होता. यामुळे कदाचित त्यांच्या युद्ध धोरणाचा पाया रचला असेल. पुतिन म्हणाले की, त्यांच्या बालपणी एकदा त्यांनी एका उंदराला कोपऱ्यात पकडले होते, पण जेव्हा उंदराने मागे वळून त्यांचा पाठलाग केला तेव्हा त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा शिकायला मिळाला.

जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या बालपणीचा हा किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो किस्सा फक्त त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यास मदत करत नाही तर युक्रेन युद्धातील त्यांच्या वृत्तीची झलक देखील देत आहे.

पुतिन यांना उंदराने पळवले होते

पुतिन यांनी वर्ष २००० मध्ये ही मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी सांगितले होते की, बालपणी ते लेनिनग्राड येथील एका जीर्ण इमारतीत राहत होते. ते आणि त्यांचे मित्र तिथल्या अरुंद कॉरिडॉरमध्ये काठ्यांनी उंदरांना हाकलून लावायचे. एके दिवशी, त्यांना एका मोठ्या उंदीरला कोपऱ्यात अडकलेले दिसले. पण नंतर मग उंदीर वळला आणि पुतिन यांच्यावर झडप घालायला  लागला, यामुळे पुतिन घाबरून पळून गेले. "कोपऱ्यात अडकलेला माणूस किती दूर जाऊ शकतो हे मला पहिल्यांदाच समजले," पुतिन म्हणाले. या घटनेचा त्यांच्या विचारसरणीवर खोलवर परिणाम झाला.

युक्रेन युद्धाशी काय संबंध?

पुतिन हे स्वतःला "कोपऱ्यात अडकलेला उंदीर" मानतात, जेव्हा दुसरा पर्याय दिसत नाही तेव्हा तो प्रत्युत्तर देतो. हीच वृत्ती युक्रेन युद्धातही दिसून येते, तिथे पुतिन यांनी नाटोचा विस्तार आणि पाश्चात्य दबाव हे स्वतःसाठी थेट धोका मानून लष्करी कारवाईचा मार्ग निवडला.

युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच, पुतिन यांच्या रणनीतीमध्ये आक्रमकता, हट्टीपणा आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष यांचा समावेश आहे. 

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया