शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला; पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट, पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2024 15:43 IST

पृथ्वीच्या वातावरणात उल्का शिरली अन् अचानक अदृष्ट झाली.

meteor impact: गेल्या दोन दिवसांपासून सर्व भारतीय श्रीराम मंदिराचा आनंदोत्सव साजरा करत आहेत. यादरम्यान पृथ्वीच्या दिशेने येणारे मोठे संकट टळले आहे. 21 जानेवारी 2024 रोजी जर्मनीची राजधानी बर्लिनच्या आकाशात एका उल्कापिंडाचा स्फोट झाला. धक्कादायक बाब म्हणजे, पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर शास्त्रज्ञांना याची माहिती मिळाली. ही उल्का पृथ्वीवर कोसळली असती, तर बर्लिन शहर आणि आजूबाजूला परिसरात मोठा विध्वंस झाला असता.

एखादी उल्का पृथ्वीच्या दिशेने येत असेल, तर शास्त्रज्ञांना आधीच माहिती मिळते. पण, पृथ्वीच्या वातावरणात आल्यानंतर उल्का दिसण्याची ही आठवी वेळ आहे. बर्लिनजवळील लाइपझिग नावाच्या परिसरात ही उल्का दिसली. पण, सुदैवाने पृथ्वीवर कोसळण्यापूर्वीच या उल्काचा स्फोट झाला. पृथ्वीवर कोसळल्यानंतर या उल्केमुळे मोठी घटना घडली असती. आता शास्त्रज्ञ याचे तुकडे शोधत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ही घटना 21 जानेवारी पहाटे घडली. अचानक एक तेजस्वी प्रकाश आभाळ चिरत पृथ्वीच्या दिशेने येत होता. पण, अचानक या उल्काचा हवेत स्पोट झाला आणि ती कुठेतरी अदृश्य झाली. शास्त्रज्ञांनी सांगितले की, सुदैवाने ही लहान आकाराची उल्का होती. जर ती मोठ्या आकाराची उल्का किंवा एखाद्या धातूपासून बनलेली उल्का असती, तर भयंकर विध्वंस झाला असता. ही उल्का समुद्रात पडली असती, तर त्सुनामीने अनेक शहरांना फटका बसला असता. 

2013 मध्ये रशियात घडलेली घटनायुरोपियन स्पेस एजन्सीने सांगितले की, 99 टक्के उल्का धोकादायक नसतात. बहुतांश उल्का 98 फुटांपेक्षा लहान असतात. लहान उल्का शोधणे आणि त्यांचा मार्ग आणि ड्रॉप पॉइंट शोधणे सोपे नाही. 2013 मध्ये रशियातील शेलियाबिन्स्कमध्ये एक उल्का वेगाने कोसळली होती. यामुळे संपूर्ण शहरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. तसेच, लोकांना काही सेकंद दिसनेही बंद झाले होते. उल्केच्या गर्मीमुळे 1600 लोक जखमी झाले होते.

टॅग्स :Germanyजर्मनीNASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल