अमेरिकेत आज एक मोठी दुर्घटना घडली असती. पण, थोडक्यात मोठा अनर्थ टळला. सोमवारी अमेरिकेतील जॉर्जियामध्ये रस्त्याच्या मधोमध एक छोटे विमान उतरले आणि नंतर ते अनेक वाहनांना धडकले. विमानात विमानतळावर पोहोचण्यासाठी इंधन नव्हते यामुळे अचानक रस्त्यावर त्याचे लँडिग करावे लागले अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, यामध्ये विमान एका वर्दळीच्या रस्त्यावर उतरताना आणि नंतर अनेक वाहनांना धडकताना दिसत आहे. या अपघातात अनेक लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे.
लँडिंगनंतर विमानाचा उजवा पंखा एका वाहनाशी आदळला आणि विमानाची इंधन टाकी लूज झाली. एका एसयूव्ही आणि वाहनाच्या मागील भागात घुसली. विमान लँडिंगनंतर रस्ता बंद करण्यात आला होता. लोकांना पुढील वाहतूक विलंब होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.
विमान गेनेसविले ली गिल्मर मेमोरियल विमानतळावरून कॅन्टनमधील चेरोकी काउंटी प्रादेशिक विमानतळाकडे जात असताना हा अपघात झाला. उड्डाणानंतर काही वेळातच, वैमानिकाला इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. त्याने गेनेसविलेकडे परत जाण्याचा निर्णय घेतला. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.
Web Summary : A small plane made an emergency landing on a Georgia road after running out of fuel, colliding with multiple vehicles. Several people sustained minor injuries. The plane, en route to Cherokee County, experienced engine trouble, prompting the emergency landing and subsequent road closure.
Web Summary : अमेरिका के जॉर्जिया में ईंधन खत्म होने के बाद एक छोटा विमान सड़क पर उतरा और कई वाहनों से टकरा गया। कई लोगों को मामूली चोटें आईं। चेरोकी काउंटी जा रहे विमान में इंजन की खराबी के कारण इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी और सड़क बंद कर दी गई।