शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

हिंदू कवीनं लिहिलं होतं पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत, पण फाळणीनंतर त्यांची झाली अशी अवस्था  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 13:38 IST

Jagannath Azad: धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत (First National Anthem of Pakistan) एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल.

१९४७ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळताना देशाची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान अशी दोन राष्ट्रं निर्माण झाली होती. मात्र धर्माच्या आधारावर ज्या पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचं पहिलं राष्ट्रगीत एका हिंदू व्यक्तीनं लिहिलं होतं, ही बाब कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल. पाकिस्तानचं पहिलं राष्ट्रगीत लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं जगन्नाथ आझाद. प्रख्यात कवी आणि शायर असलेले आझाद हे हेव्हा लाहोर येथे वास्तव्यास राहात होते. तेव्हा फाळणीची चर्चा चहुबाजूंना पसरली होती. तेव्हा मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र निर्मितीचं जिना यांचं स्वप्न पूर्ण होणार होतं. त्यावेळी देशासाठी एक स्वतंत्र राष्ट्रगीत असावं, असा विचार जिना यांच्या मनात होता.  

मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणाऱ्या जिना यांनी आपली आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा चमकवण्यासाठी वेगळी रणनीती अमलात आणली होती. त्यांनी स्वत:ला धर्मनिरपेक्ष दर्शवण्यासाठी पाकिस्तानच्या राष्ट्रगीताची रचना करू शकेल, अशा एका हिंदू शायराचा शोध सुरू केला. मात्र जिना यांच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झाली. काही वरिष्ठ मुस्लिमांनी नाराजी व्यक्त केली. एक हिंदू आमचं राष्ट्रगीत कसं काय लिहू शकतो, असा प्रश्न विचारला गेला. मात्र जिना यांनी  २४ तासांमध्ये हिंदू शायराचा शोध घेण्याचे आदेश दिले.

त्यानंतर हिंदू कवी जगन्नाथ आझाद यांचं नाव समोर आलं. त्यांचं उर्दू भाषेवर प्रभुत्व होतं. देशाची फाळणी झाली तरीही लाहोर येथेच राहण्याचा निर्धार त्यांनी केलेला होता. दुसरीकडे पाकिस्तान हा सेक्युलर देश असावा, असा जिना यांचा विचार होता. जिना आझाद यांना भेटले आणि त्यांनी पाच दिवसांच्या आत पाकिस्तानसाठी राष्ट्रगीत लिहिण्यास सांगितले. पाकिस्तान रेडिओने या गीताला संगीत दिले. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी ते प्रसारित झाले. हे गीत जिना यांना खूप आवडले. या गीताला सुमारे दीड वर्षे राष्ट्रगीताचा मान मिळाला. नंतर जिना यांच्या मृत्यूनंतर कट्टरतावादी मुस्लिम नेत्यांच्या दबावामुळे हे राष्ट्रगीत बदललं गेलं.  

दरम्यान, मी पाकिस्तानचं राष्ट्रगीत लिहिल्याने पाकिस्तानमध्ये राहणं माझ्यासाठी सुरक्षित असेल, असं जगन्नाथ आझाद यांना वाटत होतं. मात्र त्यांचं वास्तव्य असलेल्या रामनगरमध्ये कुणीच वाचलं नाही. शेवटी मित्रांच्या सांगण्यावरून जगन्नाथ आझाद यांना लाहोर सोडावं लागलं. पुढे दिल्लीत येऊन ते निर्वासितांच्या छावणीमध्ये काही काळ राहिले. तसेच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या उर्दू नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केलं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय