गाझावर १०० लढाऊ विमानांचा जोरदार हल्ला! हमासचा तळ उद्ध्वस्त, इंटरनेट आणि वीजही बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 08:34 AM2023-10-28T08:34:24+5:302023-10-28T08:34:44+5:30

इस्रायली लष्कराने गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले वाढवले आहेत.

A heavy attack of 100 fighter jets on Gaza! Hamas base destroyed, internet and electricity cut off | गाझावर १०० लढाऊ विमानांचा जोरदार हल्ला! हमासचा तळ उद्ध्वस्त, इंटरनेट आणि वीजही बंद

गाझावर १०० लढाऊ विमानांचा जोरदार हल्ला! हमासचा तळ उद्ध्वस्त, इंटरनेट आणि वीजही बंद

गेल्या २१ दिवसापासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. त्यांच्यातील युद्ध सातत्याने वाढत आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने बदला म्हणून गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त केले. दरम्यान, इस्रायली लष्कराने गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले तीव्र केल्याचे वृत्त आहे. इस्रायली लष्कराने १०० लढाऊ विमानांनी गाझावर बॉम्बहल्ला केला आहे.

हे बॉम्बहल्ले थांबवा; पॅलेस्टाइनची संयुक्त राष्ट्रांत धाव, आतापर्यंत ४ प्रस्ताव फेटाळले

गाझामधील बहुतांश भागात इंटरनेट विस्कळीत झाले आहे. इस्रायली सैन्य गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करत आहे. आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितले की, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमध्ये गेल्या काही तासांत हवाई हल्ले केले आहेत.

इस्त्रायली सैन्य आज रात्री ग्राउंड ऑपरेशन आणखी तीव्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले. IDF उत्तर गाझा आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले सुरू ठेवेल. पॅलेस्टिनींनी गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील भागात स्थलांतर करावे या विधानाचा त्यांनी पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, लष्कर हमासच्या स्थानांवर सातत्याने हल्ले करत आहे.

इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले की, हमासचे दहशतवादी रुग्णालयात लपले आहेत. हमासचा एक बोगदा शिफा हॉस्पिटलला जोडलेला आहे. शिफा हॉस्पिटलमध्ये हमासचा कमांड आणि कंट्रोल सेल आहे. रुग्णालय हे त्याचे भूमिगत दहशतवादी संकुल आहे. या युद्धात हमासचा नाश होईपर्यंत आम्ही थांबणार नसल्याचे इस्रायलने म्हटले आहे. आपण मानवांशी नाही तर राक्षसांशी लढत आहोत.

गाझामध्ये आतापर्यंत ७००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर १९ हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये ३००० हून अधिक मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबर इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे तर हजारो लोक जखमी झाले आहेत. इस्रायल-हमास युद्ध ७ ऑक्टोबर रोजी सुरू झाले. हमासने अचानक इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलनेही हमासला प्रत्युत्तर दिले आणि या कारवाया अजूनही सुरूच आहेत.

Web Title: A heavy attack of 100 fighter jets on Gaza! Hamas base destroyed, internet and electricity cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.