शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:56 IST

Donald Trump News: इस्राइल आणि इरामध्ये झालेल्या भीषण संघर्षानंतर गेले काही दिवस या भागातील वातावरण काहीसं शांत होत असतानाच इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी दिली आहे.

गेल्या महिन्यात इस्राइल आणि इराण यांच्यात पेटलेला संघर्ष कसाबसा थांबला होता. यादरम्यान, अमेरिकेने इराणमधील अणुकेंद्रांवर बी-२ बॉम्बर्स या शक्तिशाली विमानांच्या माध्यमातून हल्ला करून ती नष्ट केली होती. त्यानंतर आता या भागातील वातावरण काहीसं शांत होत असतानाच इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उघड धमकी दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे सल्लागार जवाद लारीजानी यांनी इराणमधील एका वृत्तवाहिनीवरून ही धमकी दिली असून, डोनाल्ड ट्रम्प हे आता त्यांच्या फ्लोरिडामधील निवासस्थानामध्येही सुरक्षित नाही आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

या मुलाखतीमध्ये लारीजानी म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अशी कामं केली आहेत, ज्यामुळे आता ते फ्लोरिडामधील आपल्या निवासस्थानी मोकळेपणाने सनबाथसुद्धा घेऊ शकत नाहीत. जेव्हा ते अंग शेकत उन्हात पडलेले असतील तेव्हा एक छोटंसं ड्रोन येऊन त्यांच्या बेंबीवर निशाणा साधू शकतं. हे काम खूप सोपं आहे. उन्हात पडलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर एका छोट्या ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करणं सहजसोपं आहे, असा दावाही त्यांनी केला.

आता लारीजानी यांनी दिलेल्या या धमकीकडे जानेवारी २०२० मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात इराणमधील कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जात आहे. सुलेमानी हे इराकच्या दौऱ्यावर असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. तसेच या हत्येसाठी इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार ठरवण्यात आलं होतं.

इराणकडून या धमकीसोबतच एक वागदग्रस्त ऑनलाइन मोहीमही चालवती जात आहे. त्याचं नाव ब्लड पॅक्ट असं आहे. या माध्यमातून इराण सरकार आणि खामेनेई यांचे शत्रू असलेल्या व्यक्तींविरोधात बदल्याची कारवाई करण्यासाठी निधी गोळा केला जात आहे. ८ जुलैपर्यंत या मोहिमेच्या माध्यमातून २.७ कोटी अमेरिकन डॉलर एवढी रक्कम गोळा करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. तसेच जो कुणी देवाचे शत्रू आणि खामेनेई यांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत  आणेल, त्याला बक्षीस दिलं जाईल. इराणमधील फार्स न्यूज एजन्सीसारख्या सरकारी प्रसारमाध्यमांनीही या मोहिमेला दुजोरा दिला असून, या मोहिमेला पाठिंबा देण्याचं आवाहन देशवासियांना केलं आहे.

दरम्यान, सुलेमानी यांची हत्या झाल्यापासून इराणमधील रिव्होल्युशनरी गार्ड डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत असल्याची माहिती अमेरिकेला मिळत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात आहे.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIranइराणInternationalआंतरराष्ट्रीय