शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये मोठा हल्ला, बेछूट गोळीबार, स्फोट, ४० जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 00:19 IST

Russia News: रशियाची राजधानी मॉस्कोमधील (Moscow) एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ५ हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमधील एका कॉन्सर्ट हॉलवर शुक्रवारी दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. ५ हत्यारबंद हल्लेखोरांनी केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये आतापर्यंत सुमारे ४० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर १०० हून अधिक जण जखणी झाले आहेत. मॉस्कोच्या पश्चिमेला असलेल्या क्रोसक सिटी हॉलवर बंदुकधारी हल्लेखोरांनी हा हल्ला केला. यादरम्यान, घटनास्थळावरून स्फोटांचेही आवाज येत होते. तसेच कॉन्सर्ट हॉलमधून आगीचे लोट उसळत असल्याचे दिसत होते. 

दरम्यान, या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची आणि जखमी व्यक्तींची संख्या सातत्याने वाढत आहे. घटनास्थळावरील काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये घटनास्थळावरील भीषण परिस्थिती दिसत आहे. या व्हिडीओंमध्ये हल्लेखोर बेछूट गोळीबार करताना दिसत आहेत. तर घाबरलेले नागरिक जीव मुठीत धरून पळताना दिसत आहेत. 

आणखी एका व्हिडीओमध्ये गणवेश घातलेले तीन हल्लेखोर कॉन्सर्ट हॉलच्या लॉबीमध्ये असलेल्या लोकांवर अगदी जवळून गोळ्या झाडताना दिसत आहेत. दरम्यान, रशियन सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेले जात आहे.  

रशियाचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी हा हल्ला म्हणजे भीषण आपत्ती असल्याचे म्हटले आहे. सध्या घटनास्थळी किमान ५० रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. हल्लेखोरांनी संगीताचा कार्यक्रम सुरू असताना स्वयंचलित हत्यारांच्या मदतीने गोळीबार केला. इमारतीत घुसताच त्यांनी गोळाबारास सुरुवात केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी असलेल्या लोकांची पळापळ झाली.  

टॅग्स :russiaरशियाTerror Attackदहशतवादी हल्लाInternationalआंतरराष्ट्रीय