मद्यधुंद आईवडिलांनी 9 वर्षांच्या मुलीला बसवलं ड्रायव्हिंग सीटवर
By Admin | Updated: February 27, 2016 13:30 IST2016-02-27T13:30:51+5:302016-02-27T13:30:51+5:30
मद्यधुंद अवस्थेमुळे गाडी चालवता येत नाही, म्हणून आई वडिलांनी 9 वर्षाच्या मुलीला गाडी चालवण्यास देण्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे.

मद्यधुंद आईवडिलांनी 9 वर्षांच्या मुलीला बसवलं ड्रायव्हिंग सीटवर
>ऑनलाइन लोकमत
विलकन्सिन (अमेरिका), दि. 27 - मद्यधुंद अवस्थेमुळे गाडी चालवता येत नाही, म्हणून आई वडिलांनी 9 वर्षाच्या मुलीला गाडी चालवण्यास देण्याचा धक्कादायक प्रकार अमेरिकेत घडला आहे. गंभीर म्हणजे यावेळी त्यांच्याबरोबर 11 महिन्यांची मुलगी देखील गाडीत होती.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार जेसन रॉथ व अमंदा एगर्ट हे तिशीतलं जोडपं चिक्कार दारू प्यायल्यामुळे लडखडत होतं. घरी परत कसं जायचं हा प्रश्न असताना, त्यांनी आपल्या 9 वर्षांच्या मुलीला पिकअप व्हॅनची किल्ली दिली आणि गाडी चालवायला सांगितली. त्यांच्याबरोबर 11 महिन्यांचं बाळ पण होतं.
मिनियापोलीसपासून 75 मैलांवर एक लहान मुलगी ड्रायव्हिंग सीटवर आहे असं कुणीतरी कळवल्यावर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच हस्तक्षेप करून दुर्घटना टाळली तेव्हा कुठे हा प्रकार समोर आला.
जेसन व अमंदावर बेफिकीर वर्तनामुळे जीवाला धोका उद्भवणारे कृत्य करणे आणि मुलांकडे दुर्लक्ष करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु न्यायाधीशांनी या दोघांची निर्दोष मुक्तता केली.