शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

९ महिने झाले, माजी राष्ट्राध्यक्षांचा मृतदेह तसाच! 'अखेरची इच्छा' ठरतेय अंत्यसंस्कारात अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 08:23 IST

आफ्रिकेतील एका देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळापासून चिरनिद्रेत आहेत. खरं तर ते आता या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे; पण अजूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेलेले नाहीत!

रामायणातील कथा आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. रावणाचा भाऊ कुंभकर्ण सहा महिने झोपायचा आणि सहा महिने जागा राहायचा. ही झाली पौराणिक गोष्ट. पण, आफ्रिकेतील एका देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष गेल्या नऊ महिन्यांहून अधिक काळापासून चिरनिद्रेत आहेत. खरं तर ते आता या जगात नाहीत, त्यांचा मृत्यू झालेला आहे; पण अजूनही त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेलेले नाहीत!

जांबियाच्या या माजी राष्ट्राध्यक्षांचं नाव आहे एडगर चागवा लुंगू. ५ जून २०२५ रोजी त्यांचं निधन झालं. पण इतका काळ उलटल्यानंतरही त्यांचा मृतदेह अजून दक्षिण आफ्रिकेतील शवागारात तसाच आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. 

एडगर लुंगू यांच्यावर अद्याप अंत्यसंस्कार न होण्यामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे जांबियाचे विद्यमान राष्ट्रपती हाकाइंडे हिचिलेमा यांची इच्छा आहे की, लुंगू यांच्यावर राजकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात यावेत. पण, खरी मेख इथेच आहे आणि त्याचमुळे एडगर लुंगू यांच्यावर अद्याप अंत्यसंस्कार होऊ शकलेले नाहीत. कारण, लुंगू यांनी त्यांच्या अखेरच्या दिवसांत आपल्या कुटुंबीयांना सांगितलं होतं की हिचिलेमा यांना माझ्या मृतदेहाच्या आसपाससुद्धा फडकू देऊ नका. माजी राष्ट्राध्यक्षांची ही अखेरची इच्छाच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी अडथळा ठरत आहे.  

जांबियाची राजधानी लुसाका येथील एका स्मशानभूमीत लुंगू यांच्यासाठी कबरही खोदण्यात आली आहे. शासकीय इतमामात माजी राष्ट्राध्यक्षांवर अंतिम संस्कार करायचे तर तिथे रिवाजाप्रमाणे विद्यमान राष्ट्राध्यक्ष हवेतच; पण लुंगू यांच्या कुटुंबीयांचा आणि समर्थकांचा त्याला विरोध आहे. त्यामुळे इतक्या काळापासून देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृतदेह तसाच पडला आहे. आता हा वाद न्यायालयात पोहोचला आहे, पण तिथेही गोंधळ सुरू आहे. न्यायालयांनी अनेकवेळा लुंगू यांच्या इच्छांच्या विरोधात जांबियाच्या अधिकाऱ्यांच्या बाजूनं निर्णय दिला आहे. दुसरीकडे लुंगू यांचं कुटुंब मात्र अजूनही या गोष्टीवर ठाम आहे की लुंगू यांच्यावर अंत्यसंस्कार हिचिलेमा यांना बाजूला ठेवूनच करण्यात यावेत. त्यांच्या अंत्यसंस्काराला विद्यमान राष्ट्राध्यक्षांनी हजर राहता कामा नये. तो लुंगू यांचा आणि त्यांच्या अंतिम इच्छेचा अनादर ठरेल! 

या संघर्षामागे दोन राजकीय प्रतिस्पर्ध्यांमधील दीर्घकाळ चालत आलेलं वैर आहे. ऑगस्टमध्ये पुन्हा निवडणूक लढवणारे हिचिलेमा आणि लुंगू यांच्यातील हा वाद एका आध्यात्मिक संघर्षाचं रूप घेत असल्याचंही मानलं जातं. काही विद्वान आणि धार्मिक नेत्यांचं मत आहे की लुंगू मृत्यूनंतरही परत येऊ शकतात. लुसाका येथील लाइफ ऑफ क्राइस्ट चर्चचे बिशप अँथोनी कालुबा यांनी माध्यमांना सांगितलं की हा आता केवळ भौतिक आणि राजकीय संघर्ष राहिलेला नाही, तर तो आध्यात्मिक संघर्ष बनला आहे.

हिचिलेमा यांचे समर्थक लुंगू यांची अंतिम इच्छा चुकीची आणि बेकायदेशीर मानतात. त्यांचं म्हणणं आहे की हिचिलेमा यांच्या उपस्थितीत राजकीय इतमामानं अंत्यसंस्कार करणं हेच लुंगू आणि त्यांच्या कुटुंबाप्रति उदारतेचं प्रतीक ठरेल. एका मृतदेहावरून सुरू झालेला हा वाद इतरांना विचित्र वाटू शकतो; पण जांबियामध्ये मात्र अनेकांसाठी तो प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Zambian President's Funeral Delayed 9 Months Due to Family Feud

Web Summary : Former Zambian President Edgar Lungu's funeral is stalled nine months after his death due to a family dispute. His wish to exclude current President Hichilema from the ceremony clashes with the desire for a state funeral, escalating political and spiritual tensions.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीInternationalआंतरराष्ट्रीय