९४० कारची राख करून फ्रान्समध्ये नववर्षाचे स्वागत
By Admin | Updated: January 3, 2015 02:38 IST2015-01-03T02:38:40+5:302015-01-03T02:38:40+5:30
जगभरात आतषबाजी व मनोरंजक कार्यक्रम याद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले; मात्र फ्रान्समध्ये राजधानी पॅरिससह इतर शहरात अनेकांनी जुन्या कार जाळून नववर्षाचे स्वागत केले.

९४० कारची राख करून फ्रान्समध्ये नववर्षाचे स्वागत
पॅरिस : जगभरात आतषबाजी व मनोरंजक कार्यक्रम याद्वारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले; मात्र फ्रान्समध्ये राजधानी पॅरिससह इतर शहरात अनेकांनी जुन्या कार जाळून नववर्षाचे स्वागत केले.
फ्रान्सच्या गृह मंत्रालयाने यावर्षी देशभरात ९४० कार जाळण्यात आल्याचे सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्के कमी आहे.
२०१३ ला निरोप देताना फ्रान्समध्ये एक हजार ६७ जुन्या कार जाळण्यात आल्या होत्या. गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, कार जाळण्याच्या प्रमाणात घट झाली असली तरी काही फ्रेंच नागरिकांसाठी नववर्षानिमित्त जुन्या कार जाळणे आजही प्रतिष्ठेचे लक्षण आहे. (वृत्तसंस्था)