नेपाळमध्ये पावसाचे ८५ बळी
By Admin | Updated: August 18, 2014 03:08 IST2014-08-18T03:08:52+5:302014-08-18T03:08:52+5:30
नेपाळच्या विविध जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे ८५ लोक मृत्युमुखी पडले

नेपाळमध्ये पावसाचे ८५ बळी
काठमांडू : नेपाळच्या विविध जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पूर आणि दरडी कोसळल्यामुळे ८५ लोक मृत्युमुखी पडले, तर १३९ जण बेपत्ता आहेत. मध्य-पश्चिमी भागात ७३ जणांचा मृत्यू झाला असून, १३१ जण बेपत्ता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बेपत्ता नागरिकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. पुरामुळे मध्य पश्चिम भागात सात हजारांहून अधिक घरांचे नुकसान झाले असून, बरदियामध्ये १२ हजार घरे जलमय झाली आहेत. सुरखेट जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे.