दक्षिण कोरिया-जपानमधील वादग्रस्त बेटावर एकटी राहते 81 वर्षीय महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 06:46 PM2019-02-28T18:46:45+5:302019-02-28T18:51:16+5:30

दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये दोकोदो द्वीपावरून जवळपास 250 वर्षांपासून वाद सुरू आहे.

81-year-old woman lives alone on a controversial island in South Korea and Japan | दक्षिण कोरिया-जपानमधील वादग्रस्त बेटावर एकटी राहते 81 वर्षीय महिला

दक्षिण कोरिया-जपानमधील वादग्रस्त बेटावर एकटी राहते 81 वर्षीय महिला

Next

सेऊल- दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये दोकोदो द्वीपावरून जवळपास 250 वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यामुळे हा बेटावर स्मशान शांतता असते. दक्षिण कोरिया आणि जपानच्या वादामुळे या बेटाचा विकास झालेला नाही. 81 वर्षीय किम सिन योल ही महिला गेल्या 28 वर्षांपासून या बेटावर राहते आहे. विशेष म्हणजे या बेटावर राहणारी ती एकटीच महिला आहे. तरीही ती द्वीप सोडण्यास तयार नाही. दोकोदो द्वीपावर दक्षिण कोरिया आणि जपान हे दोन्ही देश हक्क सांगतात.

17व्या शतकापासून हा द्वीप आमचं एक अंग असल्याचा दावा दक्षिण कोरियानं केला आहे. तर जपान हा बेट स्वतःचा भाग असल्याचं सांगत आहे. इथे ज्वालामुखीचा उद्रेक होत असल्यानं जास्त लोक येत नाहीत. किम सिन-योल पहिल्यांदा 1991मध्ये स्वतःच्या पतीबरोबर या बेटावर आली. नैसर्गिक गॅस आणि खनिजांची विपुल मर्यादा असतानाही जीवनावश्यक वस्तूंची कमी असल्यानं इथे राहणं जिकिरीचं आहे. मोसम बिघडलेलं असल्यावर या द्वीपाचा महिनाभर शहराशी संपर्क तुटतो. परंतु फ्री डायव्हिंगमध्ये पारंगत असलेल्या किम सिन-योल यांना इथे राहण्यास कोणतीच अडचण नाही.

अनेकदा त्या फक्त मासे खाऊन जगल्या आहेत. पतीनच्या निधनानंतरही किम यांना हा द्वीप सोडावासा वाटत नाहीये. पोलीस आणि लाइटहाऊस ऑपरेटर काही दिवसांनी इथे येऊन परिस्थितीचा अंदाज घेऊन परत जातात. परंतु किम वाढत्या वयातही तो बेट सोडत नाही आहे. द्वीप वादग्रस्त असतानाही अनेक लोकांनी इथे थांबण्याची इच्छा व्यक्त केली आहे. स्थानिक सरकार सुविधांच्या अभावी इथे लोकांना पाठवण्यास तयार नाही. त्यामुळे तिथे कोणालाही राहण्याची परवानगी दिली जात नाही.

Web Title: 81-year-old woman lives alone on a controversial island in South Korea and Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.