८ अनिवासी भारतीयांना पुरस्कार

By Admin | Updated: July 5, 2015 22:56 IST2015-07-05T22:49:12+5:302015-07-05T22:56:45+5:30

ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलिमोरिया यांना यावर्षीचा उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

8 Non Resident Indians Award | ८ अनिवासी भारतीयांना पुरस्कार

८ अनिवासी भारतीयांना पुरस्कार


लंडन : ब्रिटनमधील आघाडीचे अनिवासी भारतीय उद्योजक लॉर्ड करण बिलिमोरिया यांना यावर्षीचा उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय भारतीय नागरिक असा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. व्यवसाय व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. ब्रिटनमधील भारताचे उप उच्चायुक्त वीरेंद्र पॉल यांनी एका समारंभात बिलिमोरिया यांना सन्मानित केले. इतर ८ भारतीयांनाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून, त्यात सरोश झाईवाला, उमा वधवानी, कॅप्टन नलीन पांडे, रवींद्रसिंग गिदार, प्रवीणकांत अमीन, बजरंग बहादूर माथुर, संजय वधवानी यांनाही याच कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

Web Title: 8 Non Resident Indians Award