मोझांबिकमध्ये इंधन टँकरच्या स्फोटात ७३ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 07:41 IST2016-11-18T07:41:43+5:302016-11-18T07:41:43+5:30
मोझांबिकमधील तेते प्रांतात इंधन वाहून नेणा-या एका टँकरचा स्फोट झाला.

मोझांबिकमध्ये इंधन टँकरच्या स्फोटात ७३ ठार
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मापुटो, दि. १८ - मोझांबिकमधील तेते प्रांतात इंधन वाहून नेणा-या एका टँकरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत ७३ जण ठार झाले असून शंभरपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. तेते प्रांतात मलावी नजीक ही घटना घडली.
सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सर्व जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मोझांबिक हा अफ्रिका खंडातील एक गरीब देश असून सततच्या दुष्काळामुळे येथील अन्नधान्याची समस्या अत्यंत बिकट आहे.