शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पाक व्याप्त काश्मीरच्या ७३ टक्के नागरिकांना हवे आहे स्वातंत्र्य!, सर्व्हेमधून उमटला आवाज, पाक सरकारने वृत्तपत्राला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 01:26 IST

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

इस्लामाबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्तानात राहण्यासंबंधी तुमचे काय मत आहे? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात ७३ टक्के लोकांनी आम्हाला पाकिस्तानात राहण्याची इच्छा नसून, स्वातंत्र्याची मागणी केली होती. या सर्व्हेमुळे पाकिस्तानात खळबळ माजली आणि सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता वृत्तपत्राला टाळे ठोकले.एका भारतीय इंग्रजी वृत्तवाहिनीने त्या दैनिकाचे संपादक हॅरिस कादिर यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली, तेव्हा ते म्हणाले की, आम्ही सर्व्हेमध्ये लोकांना दोन प्रश्न विचारले होते. पाकव्याप्त काश्मीरला १९४८ मध्ये मिळालेला दर्जा बदलण्यात यावा, असे वाटते का, असा पहिला प्रश्न होता. त्याच्या उत्तरात अनेकांनी सकारात्मक म्हणजेच ‘होय’ असे सांगितले. दुस-या प्रश्नाला उत्तर देताना ७३ टक्के लोकांनी पाकव्याप्त काश्मीर हा भाग पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हायला हवा, असे मत व्यक्त केले.हा सर्व्हे प्रकाशित झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने सर्वात आधी आपणास नोटीस पाठवून धमकावले, असे हॅजरस कादिर म्हणाले. त्यानंतर त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयालाच कुलुपच ठोकले, अशीही माहिती त्यांनी दिली. या सर्व्हेमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील सुमारे १0 हजार लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. हा सर्व्हे घाईघाईने केलेला नसून, तो पाच वर्षे सुरू होता, अशी माहितीही कादिर यांनी दिली. पाकिस्तानपासून आम्हाला स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी यापूर्वीही अनेकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये झाली आहे. (वृत्तसंस्था)लोकांचा रोषया सर्व्हेमुळे खळबळ माजली असून, त्याचा धसका घेतलेल्या पाक सरकारने वृत्तपत्रावर कारवाईचा बडगा उगारला आहे. सरकारच्या निर्णयावर लोकांनी रोष व्यक्त केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरPakistanपाकिस्तानIndiaभारत