दक्षिण फिलीपिन्सनमध्ये शुक्रवारी जोरदार भूकंप झाला. या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.६ होती. किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटर होता. किनारी भागात भूकंपाचे केंद्र असल्याने त्सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या भूकंपामुळे कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. आणखी भूकंपाचे धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या त्सुनामी वॉर्निंग सिस्टीमने म्हटले आहे की, भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटरच्या परिसरात जीवघेणी त्सुनामी येऊ शकते. पुढील दोन तासांत त्सुनामी लाटा समुद्रापर्यंत पोहोचू शकतात.
पहिली त्सुनामी लाट सकाळी ९:४३ ते ११:४३ दरम्यान येऊ शकते. या लाटा अनेक तासांपर्यंत सुरू राहू शकतात, असा इशारा देण्यात आला. गेल्या आठवड्यात फिलीपिन्समध्ये ६.९ तीव्रतेच्या भूकंपात अंदाजे ७४ लोकांचा मृत्यू झाला. अनेक ऐतिहासिक इमारतींचेही नुकसान झाले होते.
गुरुवारी चीनमध्ये झाला होता भूकंप
चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर नुसार, एक दिवस आधी, नैऋत्य चीनच्या सिचुआन प्रांतातील गांझी तिबेटी स्वायत्त प्रीफेक्चरमधील झिनलाँग काउंटीमध्ये गुरुवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे १:१७ वाजता ५.४ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र ३०.८४ अंश उत्तर अक्षांश आणि ९९.८६ अंश पूर्व रेखांशावर, १० किलोमीटर खोलीवर होते.
Web Summary : A strong earthquake struck the southern Philippines, triggering a tsunami warning. Coastal residents are urged to evacuate. The quake, registering 7.6 magnitude, originated 10km deep. A deadly tsunami is possible within 300km of the epicenter, with waves expected within hours. China also experienced a 5.4 magnitude earthquake.
Web Summary : दक्षिणी फिलीपींस में शक्तिशाली भूकंप आया, सुनामी की चेतावनी जारी। तटीय निवासियों को निकालने की सलाह दी गई। रिक्टर पैमाने पर 7.6 तीव्रता का भूकंप 10 किमी गहराई पर था। केंद्र से 300 किमी के भीतर सुनामी का खतरा, कुछ घंटों में लहरें आने की आशंका। चीन में भी 5.4 तीव्रता का भूकंप।