शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 09:44 IST

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना नजरबंदीत ठेवण्याचा आदेश दिला होता.

सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही. प्रत्येकाला सत्ता हवी असते आणि एकदा का सत्ता मिळाली की ती सहजासहजी कोणालाच सोडायची नसते. ब्राझीलचे ७० वर्षीय माजी राष्ट्रपती जायेर बोल्सोनारो यांचं नाव सध्या यासंदर्भात प्रचंड गाजतं आहे. बाझीलच्या सर्वोच्च न्यायालयानं त्यांना तब्बल २७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

का? नेमकं काय केलं होतं बोल्सोनारो यांनी? त्यांना का एवढ्या मोठ्या शिक्षेला सामोरं जावं लागतंय? - आपली सत्ता वाचवण्यासाठी त्यांनी अत्यंत कुटील कारस्थानं केली आणि एखाद्या गुंडाप्रमाणे आपली दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला, खून आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांच्यावर आरोप आहेत. २०२२ च्या राष्ट्रपती निवडणुकीत बोल्सोनारो यांचा पराभव झाला. मात्र, त्यानंतरसुद्धा त्यांना सत्ता सोडायची नव्हती. त्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी खटपटी लटपटी केल्या. विद्यमान राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांचं सरकार उलथून पाडण्याचा कट रचला. ब्राझीलच्या सरकारी वकिलांचा आरोप आहे की, बोल्सोनारो यांनी निवडणूक हरल्यानंतर सत्ता वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टावर हल्ल्याचा कट रचला. राष्ट्रपती लुला डी सिल्वा आणि न्यायाधीश मोराएस यांच्या हत्येची योजना आखली. सैन्याच्या मदतीनं निवडणूक निकाल बदलण्याचा प्रयत्न केला !

हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना नजरबंदीत ठेवण्याचा आदेश दिला होता. पण नजरबंदीतही ते स्वस्थ बसले नाहीत. हाऊस अरेस्टमध्ये असतानाही आपल्या तीन खासदार मुलांच्या माध्यमातून त्यांनी सार्वजनिक संदेश पाठवले. रिओ डी जेनेरियोमधील त्यांच्या समर्थकांच्या रॅलीला मुलाच्या फोनवरून त्यांनी संबोधित केलं. सर्वोच्च न्यायालयानं बोल्सोनारो यांना यावरून फटकारलं आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर लावण्याचा तसंच घरातील सर्व मोबाइल जप्त करण्याचा आदेश दिला होता. 

एवढं झाल्यानंतर तरी बोल्सोनारो यांनी गप्प बसावं ना! पण त्यांनी त्या मॉनिटरमध्येही छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. इलेक्ट्रॉनिक अँकल मॉनिटर म्हणजे पायाच्या टाचेजवळ घड्याळासारखं किंवा ब्रेसलेटसारखं लावलं जाणारं एक इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग उपकरण आहे. ज्या व्यक्तीला हे उपकरण बसवलं जातं, ती व्यक्ती कुठे आहे, कुठे-कुठे गेली हे ते सतत ट्रॅक करतं. जीपीएस किंवा रेडिओ सिग्नलच्या मदतीनं ही माहिती न्यायालय/पोलिसांकडे पोहोचवली जाते. एखाद्या व्यक्तीला तुरुंगात न ठेवता घरगुती नजरकैद किंवा तपासादरम्यान नियंत्रित स्वातंत्र्य देण्यासाठी हे उपकरण वापरलं जातं. पण, बोल्सोनारो यांनी हे उपकरणही सोल्डरिंग आयर्ननं जाळण्याचा प्रयत्न केला! बोल्सोनारो यांनी ते नाकारण्याचा प्रयत्न केल्यावर न्यायालयानं बोल्सोनारो मॉनिटर जाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा व्हिडीओच जारी केला! बोल्सोनारो पळून जाण्याची शक्यता असल्यानं त्यांना ब्राझीलिया येथील फेडरल पोलिस हेडक्वार्टरमध्येच निगराणीखाली ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. ट्रम्प यांनी याही प्रकरणात उडी घेतली आहे. न्यायालयाचा निर्णय ‘विच हंट’ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे जवळचे मित्र मानले जातात.

English
हिंदी सारांश
Web Title : Ex-Brazil President Bolsonaro sentenced to 27 years for power abuse.

Web Summary : Bolsonaro, Brazil's ex-president, faces 27 years for abusing power. Accused of plotting a coup after his 2022 election loss, he allegedly planned attacks and even tried to tamper with his ankle monitor while under house arrest.
टॅग्स :Brazilब्राझीलWorld Trendingजगातील घडामोडी