पाकमध्ये भीषण स्फोटात ६९ ठार

By Admin | Updated: March 28, 2016 03:49 IST2016-03-28T03:49:23+5:302016-03-28T03:49:23+5:30

पाकिस्तानात लाहोरमध्ये रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६९ जण ठार तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला व मुलांची संख्या अधिक आहे. शहरातील एका सार्वजनिक

69 killed in Pakistan blasts | पाकमध्ये भीषण स्फोटात ६९ ठार

पाकमध्ये भीषण स्फोटात ६९ ठार

लाहोर : पाकिस्तानात लाहोरमध्ये रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात ६९ जण ठार तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला व मुलांची संख्या अधिक आहे. शहरातील एका सार्वजनिक उद्यानात आत्मघातकी हल्लेखोराने हा स्फोट घडवून आणला.
लाहोर शहराच्या पूर्व भागात मध्यवर्ती ठिकाणी गुलशन-ए-इक्बाल हे उद्यान आहे. रविवार असल्याने येथे अनेक जण कुटुंबासह आले होते. यात ख्रिश्चन नागरिकही मोठ्या प्रमाणात होते, असे सांगण्यात येते. सायंकाळी ६.४०च्या सुमारास हे उद्यान शक्तिशाली स्फोटाने हादरले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोटानंतरचे दृश्य अतिशय भयंकर होते. सर्वत्र रक्ताचा सडा आणि मृतदेह अस्ताव्यस्त पडलेले होते.

Web Title: 69 killed in Pakistan blasts