शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

रशियातील मॉलला लागलेल्या भयावह आगीत ६४ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 3:43 AM

पूर्व रशियाच्या सायबेरियातील केमेरोव्हो शहरात विंटर चेरी मॉलला रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत ६४ जण ठार झाले.

मॉस्को : पूर्व रशियाच्या सायबेरियातील केमेरोव्हो शहरात विंटर चेरी मॉलला रविवारी सायंकाळी लागलेल्या आगीत ६४ जण ठार झाले. शाळांना लागलेल्या सुट्यांचा हा पहिलाच आठवडा असल्यामुळे मॉलमध्ये मुले आणि त्यांच्या पालकांची मोठी गर्दी होती. हा मॉल मॉस्कोच्या पूर्वेकडे सुमारे तीन हजार किलोमीटरवर आहे.हा मॉल संपूर्ण रात्रभर मॉल जळत होता. ती आग सोमवारी सकाळनंतर विझवण्यात आलीआणि काही मृतदेह चित्रपटगृहात आढळले. अग्निशमन दलाने मॉलच्या चार मजल्यांवरील शोध मोहीम पूर्ण केल्यानंतर ६४ जणांचा मृत्यूझाल्याचे स्पष्ट झाले. आणखी सहा मृतदेह आतमध्ये असल्याचे सांगण्यात आले. याखेरीज अनेक जण बेपत्ता आहेत.इमर्जन्सी सिच्युएशन विभागाचे मंत्री व्लादिमिर पुचकोव्ह म्हणाले की, दहा जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणांमुळे लागली याबाबत स्थानिक प्रशासन अधिक तपास करीत आहे .कित्येक जखमी व बेपत्ता; अग्निशमन यंत्रणाच होती निकामी, रात्रभर आगीचे तांडवमॉलच्या चौथ्या मजल्यावरून ११ वर्षांच्या मुलाने खिडकीतून उडी मारल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याचे पालक आणि धाकटा भाऊ आगीत दगावले आहेत. चौकशी समितीने मॉलच्या भाडेकरूंसह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.चौथ्या मजल्यावर लागलेल्या आगीचे नेमके कारण मात्र समजलेले नाही. सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आणि दुर्लक्ष झाल्याची शक्यता तपासली जात आहे. आग लागल्याचा इशारा देणारा भोंगा वाजला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मॉलमधून लोकांना बाहेर काढता आलेले नाही. मात्र आग लागताच मॉलमधील सर्व कर्मचारी तेथून पळून गेले, असे साक्षीदारांचे म्हणणे आहे.आरडाओरडा केल्यामुळे समजलेया मॉलच्या जागीपूर्वी मिठाईचा कारखाना होता. त्याचे २०१३ मध्ये मॉलमध्ये रूपांतर झाले. विंटर चेरी मॉल मुलांमध्ये करमणुकीसाठी खूप लोकप्रिय होता. इथे प्राणी संग्रहालय व चित्रपटगृहही होते. अ‍ॅना झॅरेचनेव्हा सगळ््यात वरच्या मजल्यावर पती व मुलासह चित्रपट बघत होत्या. याच मजल्यावर आधी आग लागली. त्या म्हणाल्या, चित्रपटगृहात एक जण आग लागल्याचे ओरडत आल्यावरच आम्हाला कळाले. चित्रपट सुरू असल्याने दिवेही बंद होते. हा चित्रपट आमच्यासाठी शेवटचा ठरणार, असे वाटले होते. मॉलचे सुरक्षा कर्मचारी कुठेही दिसत नव्हते. माझे पती वरच्या पायºयांवर उभे राहून लोकांना बाहेर पडण्यास मदत करीत होते.जाता-जाता चिमुकली म्हणाली...‘‘माझा श्वास गुदमरतोय... घरच्यांना सांगा... आय लव्ह देम! इथे सर्वकाही जळतेय. सर्व दरवाजेही बंद करण्यात आले आहेत. बाहेर पडण्यासाठी एकही जागा नाही..’’ हे अखेरचे शब्द होते १२ वर्षांच्या एका चिमुकलीचे. आगीत मृत्यू झालेल्या व्हिक्टोरिया पोचांकिना हिने जाता-जाता घरच्यांना असा संदेश दिला.