शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन खामेनी', ख्रिसमसला आखला कट, जिनेव्हात चर्चा फिसकटली अन् ६० सेकंदात इराणचं नेतृत्व संपलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:38 IST

अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने खामेनी यांच्या सवयीला बनवलं मृत्यूचं हत्यार

Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा खात्मा हा केवळ एक लष्करी हल्ला नव्हता. अमेरिका आणि इस्त्रायलने गेल्या अनेक महिन्यांपासून रचलेल्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या कटातून हा हल्ला झाला. अमेरिकेची गु्प्तचर यंत्रणा सीआयएच्या गुप्त अहवालातून या मोहिमेचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. ५ मुख्य सूत्रधारांच्या साक्षीने समोर आलेली ही माहिती कोणत्याही हॉलिवूडपटापेक्षा कमी नाही.

फ्लोरिडामध्ये कटाची सुरुवात

या महाविनाशक मोहिमेची ठिणगी गेल्या वर्षी ख्रिसमसच्या सुमारास पडली. फ्लोरिडातील मार-ए-लागो इथे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत नेतन्याहू यांनी इराणच्या अणू कार्यक्रमाचे पुरावे सादर केले. तिथेच ट्रम्प यांनी इराणच्या मिसाईल साईट्स नष्ट करण्यासाठी इस्त्रायलला पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले.

खामेनींचा 'डे-पॅटर्न' आणि सीआयएची नजर

सीआयए आणि इस्त्रायली गुप्तचर संस्थांनी खामेनी यांच्या दैनंदिन जीवनाचा सूक्ष्म अभ्यास केला होता. ते कोणाला भेटतात? कोणत्या मार्गाने प्रवास करतात?हल्ल्याची धमकी मिळाल्यास कुठे लपतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे गुप्तचरांनी शोधून काढली होती. महत्त्वाचे म्हणजे, खामेनी हे रात्रीपेक्षा दिवसा स्वतःला अधिक सुरक्षित मानत असत. नेमकी हीच बाब त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली.

६० सेकंद अन् सगळं संपलं!

२६ फेब्रुवारीला जिनेव्हा येथे झालेली राजनैतिक चर्चा अपयशी ठरली आणि ट्रम्प यांनी लष्करी कारवाईच्या फाईलवर स्वाक्षरी केली. २८ फेब्रुवारीला तेहरानमधील एकाच कंपाउंडमध्ये खामेनी, राष्ट्रपती आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी वेगवेगळ्या बैठकांसाठी जमले होते. ही इराणची सर्वात मोठी सुरक्षा चूक ठरली. पहाटेच्या ऐवजी दिवसा हल्ला करून इस्त्रायलने इराणला गाफील ठेवले. ६० सेकंदांच्या आत कंपाउंडमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर अचूक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यात खामेनी यांच्यासह रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे प्रमुख आणि इतर ४० वरिष्ठ अधिकारी जागीच ठार झाले.

अमेरिकेची अवाढव्य तयारी

हा हल्ला करण्यापूर्वी अमेरिकेने मध्य-पूर्वेत आपली पूर्ण ताकद झोकून दिली होती. शेकडो लढाऊ विमाने, टँकर्स, युद्धनौका आणि पाणबुड्या इराणच्या दिशेने रवाना करण्यात आल्या होत्या. इराणने प्रत्युत्तर दिल्यास त्याचे परिणाम भोगण्यासाठी अमेरिका पूर्णतः सज्ज होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Operation Khamenei: 60 seconds ended Iran's leadership, planned at Christmas.

Web Summary : A US-Israeli plot, years in the making, culminated in Ayatollah Khamenei's death. Planned during a secret Trump-Netanyahu meeting, the operation exploited Khamenei's daytime security preference. Airstrikes killed Khamenei and 40 officials.
टॅग्स :Ayatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईIranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल