शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भारतासह पाच देशांत ५९% दहशतवादी हल्ले, अमेरिकेचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 04:36 IST

जगभरात २०१७ साली झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या पाच देशांमध्ये झाले.

वॉशिंग्टन : जगभरात २०१७ साली झालेल्या एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी ५९ टक्के हल्ले हे आशियातील भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराक, फिलिपाईन्स या पाच देशांमध्ये झाले. मात्र, २०१७ मध्ये दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले असून, त्यामुळे हल्ल्यांतील बळींचे प्रमाणही घटले आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या दहशतवादविरोधी विभागाने गेल्या वर्षी जगभरात झालेल्या दहशतवादी कारवायांसंदर्भातअहवाल तयार केला आहे. त्या विभागाचे प्रवक्ते नाथन सॅलेस यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जगातील १०० देशांमध्ये दहशतवादी हल्ले झाले. या हल्ल्यांतील ७० टक्के बळी हे अफगाणिस्तान, इराक, नायजेरिया, सोमालिया, सिरिया या पाच देशांमध्ये गेले आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिका व तिच्या मित्र राष्ट्रांनी लढा सुरू ठेवला असला तरी इसिस, अल कायदा व त्यांच्याशी संलग्न गट, संघटना यांचा पूर्णपणे नायनाट करणे शक्य झालेले नाही.इसिसपासून प्रेरणा घेऊन; पण कधीही सिरिया किंवा इराकमध्ये न जाताही विविध ठिकाणचे तरुण दहशतवादाकडे वळत आहेत. बर्लिन, बार्सिलोना, लंडन, मारावी, न्यूयॉर्क अशा अनेक ठिकाणी अशी उदाहरणे २०१७ साली पाहायला मिळाली, असे अहवाल म्हणतो. दहशतवादाविरोधात कठोर कारवाईबद्दल भारताची अमेरिकेने प्रशंसा केली. दहशतवादी पाकिस्तानी भूमीचा वापर करून भारतात हल्ले करीत आहेत. त्यांना रोखण्यासाठी भारताने अमेरिका व समविचारी देशांची मदत घेतली आहे. भारतातील नक्षलग्रस्त भाग, जम्मू-काश्मीर व ईशान्येकडील राज्यांत दहशतवादी कारवाया सुरूच असतात, असा उल्लेख आहे. (वृत्तसंस्था)>भारतीय उपखंडाला धोकापाकिस्तानमधून घातपाती कारवाया करणाऱ्या हक्कानी नेटवर्क, अफगाणिस्तानी तालिबान, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आदी दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी तेथील सरकार कठोर कारवाई करीत नसल्याबद्दल अहवालात नाराजी व्यक्त करीत, या संघटनांपासून भारतीय उपखंडाला मोठा धोका असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीAmericaअमेरिका