युद्धामुळे ५,७६,००० लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर; ट्रकवर गाेळीबार अन् लूट : संयुक्त राष्ट्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 07:44 AM2024-02-29T07:44:21+5:302024-02-29T07:44:32+5:30

युद्धग्रस्त गाझाच्या २३ लाख लोकसंख्येला अन्न असुरक्षिततेचा किंवा त्याहूनही वाईट धोका निर्माण झाला आहे.

576,000 people on the brink of starvation due to war; Trucks fired and looted: United Nations | युद्धामुळे ५,७६,००० लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर; ट्रकवर गाेळीबार अन् लूट : संयुक्त राष्ट्र

युद्धामुळे ५,७६,००० लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर; ट्रकवर गाेळीबार अन् लूट : संयुक्त राष्ट्र

संयुक्त राष्ट्र : युद्धामुळे गाझावर मोठे संकट आले आहे. गाझाच्या लोकसंख्येपैकी किमान एक चतुर्थांश लोकसंख्या म्हणजेच तब्बल ५ लाख ७६ हजार लोकांची रोज उपासमार होत असून, त्यांना दोन वेळेचे पुरेसे जेवणही मिळेनासे झाले आहे. त्यामुळे उपासमारीने त्रस्त असलेले लोक केवळ मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवर गोळीबार करत नाहीत, तर त्या ट्रकची लूटही करत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

 युद्धग्रस्त गाझाच्या २३ लाख लोकसंख्येला अन्न असुरक्षिततेचा किंवा त्याहूनही वाईट धोका निर्माण झाला आहे. उत्तर गाझामध्ये तर परिस्थिती आणखी बिकट असून, येथे लोकांना अन्नपदार्थ आणि इतर आवश्यक वस्तूंचा प्रचंड तुडवडा जाणवत आहे.

परिस्थिती आणखी बिघडणार
गाझामधील परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. गाझाच्या लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक भूकबळीच्या उंबरठ्यावर आहेत आणि उत्तर गाझामधील दोन वर्षांखालील सहा मुलांपैकी १ कुपोषणाने ग्रस्त आहे.

२९,९५४ जणांचा इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये मृत्यू झाला आहे.
७०,३२५ जण गाझात गंभीर जखमी झाले आहेत.
१,१३९ जणांचा इस्रायलमध्ये मृत्यू, तर ८,७३० जण जखमी झाले आहेत.

गाझामधील बाल कुपोषणाची पातळी ही जगात सर्वाधिक गंभीर आहे. परिस्थिती बदलली नाही, तर उत्तर गाझामध्ये दुष्काळ पसरेल.
- कार्ल स्काऊ, उपकार्यकारी संचालक, 
जागतिक अन्न कार्यक्रम

Web Title: 576,000 people on the brink of starvation due to war; Trucks fired and looted: United Nations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.