शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी भारताला ५५ देशांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 04:48 IST

आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे.

संयुक्त राष्ट्रे  - आशिया-प्रशांत समूहाने संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. भारतासाठी हा राजनैतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विजय असून, यावरून जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावल्याचे प्रतीत होते.पंधरा देश सदस्य असलेल्या या परिषदेच्या पाच हंगामी सदस्यांसाठी २०२१-२२ या दोन वर्षांच्या मुदतीसाठी पुढील वर्षात जूनच्या आसपास निवडणूक होणार आहे.यूएनएससीने या परिषदेच्या दोन वर्षांच्या हंगामी सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीला सर्वानुमते मंजुरी दिली. सर्व ५५ सदस्यांनी एकमुखी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद, असे संयुक्त राष्ट्रांतील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी टष्ट्वीट केले आहे.भारताच्या उमेदवारीला पाठिंबा देणाऱ्या ५५ देशांत अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, इंडोनेशिया, इराण, जपान, कुवैत, किर्गिझिस्तान, मलेशिया, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान, कतार, सौदी अरब, श्रीलंका, सिरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात आणि व्हिएतनामचा समावेश आहे. दरवर्षी १९३ सदस्यीय संयुक्त राष्ट्रांची आमसभा दोन वर्षांसाठी संयुक्त राष्टÑ सुरक्षा परिषदेच्या पाच हंगामी सदस्यांची निवड करते. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे पाच देश संयुक्त राष्टÑ सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य आहेत. विभागीय आधारावर या परिषदेच्या दहा हंगामी जागांचे वाटप करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारत