Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 02:10 PM2022-03-23T14:10:09+5:302022-03-23T14:11:46+5:30

Coronavirus : देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सध्या परिस्थिती गंभीर होत आहे.

4th wave alert? New Zealand reports 20,907 new community cases of COVID-19 | Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

Coronavirus : 'या' देशात कोरोनाची चौथी लाट? एकाच दिवसात 20 हजारांहून अधिक रुग्ण आढळले

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा स्थितीत न्यूझीलंड देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंतेचा विषय वाढला आहे. न्यूझीलंडमध्ये मंगळवारी (22 मार्च 2022) कोरोना व्हायरसची  20,907 नवीन समुदाय प्रकरणे आढळली आहेत. तसेच, या देशात कोरोना व्हायरसमुळे 15 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 199 वर पोहोचली आहे. त्यामुळे न्यूझीलंडमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा कहर सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. 

न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, नवीन समुदाय संक्रमणांपैकी 4,291 हे सर्वात मोठे शहर ऑकलँडमध्ये होते. तर कॅंटरबरीत 3, 488 प्रकरणांसह उर्वरित प्रकरणे देशभरात आढळली आहेत. तसेच, न्यूझीलंड सीमेवर 34 नवीन संसर्गजन्य रुग्ण आढळले आहेत, असे मंत्रालयाने सांगितले. दरम्यान, न्यूझीलंडच्या रुग्णालयांमध्ये सध्या 1,016 कोरोना रुग्ण आहेत, ज्यात 25 लोक आयसीयू किंवा हाय डिपेंडेंसी युनिटमध्ये आहेत. 

देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे सध्या परिस्थिती गंभीर होत आहे. न्यूझीलंड मंत्रालयाने कोरोनामुळे 15 मृत्यूची नोंद केली आहे, ज्यामुळे देशातील आतापर्यंत एकूण मृत्यूंची संख्या 199 वर पोहोचली आहे. न्यूझीलंडमध्ये महामारी सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या 5,17,495 प्रकरणांची नोंद झाली आहे.

'4 एप्रिलपासून लसीकरण करणे आवश्यक'
दरम्यान, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न म्हणाल्या की, केवळ वृद्ध आणि आरोग्य क्षेत्र आणि फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासह कमजोर लोकांसोबत काम करणाऱ्यांना 4 एप्रिलपासून लसीकरण करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, आता रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि इतर सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी लस पास अनिवार्य असणार नाही. 12 वर्षांवरील न्यूझीलंडच्या लोकसंख्येपैकी 95% पेक्षा जास्त लोकांना आता दोन लसी मिळाल्या आहेत.

Web Title: 4th wave alert? New Zealand reports 20,907 new community cases of COVID-19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.