४८ मदरशांवर कारवाई होणार

By Admin | Updated: June 7, 2015 12:41 IST2015-06-06T00:14:30+5:302015-06-07T12:41:00+5:30

पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या सरकारने राज्यातील ४८ मदरशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरशात मुलांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रेरित केले जाते, असा आरोप आहे.

48 Madrasas will take action | ४८ मदरशांवर कारवाई होणार

४८ मदरशांवर कारवाई होणार

कराची : पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या सरकारने राज्यातील ४८ मदरशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदरशात मुलांना दहशतवादी कृत्ये करण्यास प्रेरित केले जाते, असा आरोप आहे.
सिंध प्रांताचे मुख्यमंत्री कायम अली शाह यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. माहितीमंत्री शार्जील इनाम मेमन यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. देशातील ४८ मदरशांत देशविघातक कारवाया चालतात याचे पक्के पुरावे आमच्याकडे आहेत, असे मेमन यांनी सांगितल्याचे वृत्त ‘डॉन’ने दिले आहे. दहशतवादाला आर्थिक मदत करणाऱ्या स्रोतांवरही कारवाई केली जाणार आहे. पाकिस्तानात २५ हजारांपेक्षा जास्त मदरसे असून, वेगवेगळ्या संघटनांतर्फे ते चालविले जातात. (वृत्तसंस्था)

मलाला युसूफझईच्या
८ हल्लेखोरांची सुटका
४मलालावरील हल्ल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या दहा आरोपीपैकी आठ जणांना पाकिस्तानात मोकळे सोडण्यात आले आहे. एप्रिलमध्ये न्यायालयाने हल्ल्यात सहभागी दहा आरोपींना २५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र या आठ जणांविरोधात पुरेसा पुरावा नसल्याने त्यांना मुक्त करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

१०७ अब्ज डॉलरची
आर्थिक हानी
४दहशतवादाच्या विळख्यामुळे पाकिस्तानची १०७ अब्ज डॉलरची हानी झाली असल्याचे एका सरकारी दस्तावेजात म्हटले आहे. हा दस्तावेज अर्थमंत्री इशाक दार यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक राष्ट्रीय आर्थिक सर्वेक्षणाचा एक भाग आहे. सकारात्मक बाजू म्हणजे यशस्वी लष्करी मोहिमांमुळे सुरक्षा स्थितीत सुधारणा होऊन सलग चौथ्या वर्षी दहशतवादाशी संबंधित हानीचे प्रमाण खाली आले.

४कारवाई करण्याआधी विफकुल मदारीस या मदरशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेला विश्वासात घेऊनच पुढचे पाऊल टाकले जाणार आहे, असे मेमन म्हणाले.

Web Title: 48 Madrasas will take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.