शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

इराणचा कणा मोडला; 'ऑपरेशन लायन्स रोअर'मध्ये ४८ बडे नेते ठार; ट्रम्प यांची मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 22:20 IST

४८ इराणी नेत्यांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

Donald Trump on Iran Attack: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता अमेरिका आणि इस्रायलच्या ऑपरेशन लायन्स रोअरने इराणला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या माहितीनुसार, या लष्करी कारवाईत इराणच्या एकापाठोपाठ एक अशा ४८ बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे. कोणालाही विश्वास बसणार नाही इतके मोठे यश आम्हाला मिळत आहे, असे विधान ट्रम्प यांनी एका मुलाखतीत केले.

एकाच झटक्यात ४८ नेत्यांचा अंत

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, इराणमधील अमेरिकन लष्करी मोहीम अपेक्षेपेक्षा कितीतरी वेगाने पुढे सरकत आहे. शनिवारी सकाळी झालेल्या या भीषण हल्ल्यात केवळ खामेनीच नव्हे, तर इराणच्या लष्करी आणि राजकीय वर्तुळातील ४८ प्रभावशाली नेते मारले गेले आहेत. यामध्ये रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे काही वरिष्ठ कमांडर आणि संरक्षण मंत्र्यांचाही समावेश असल्याचे समजते.

ऑपरेशन लायन्स रोअर काय आहे?

हे अमेरिका आणि इस्रायलचे संयुक्त ऑपरेशन आहे, ज्याचे मुख्य उद्दिष्ट इराणची आण्विक क्षमता नष्ट करणे आणि तिथली सत्तापालट करणे हे आहे. ट्रम्प यांनी या मोहिमेला ऐतिहासिक यश म्हटले असून, इराणचा प्रभाव मध्य आशियातून कायमचा संपवण्याचे संकेत दिले आहेत.

इराणचा लाल निशाण फडकवून पलटवार

आपल्या नेत्यांच्या मृत्यूने संतप्त झालेल्या इराणने आता थेट युद्धाचे पाऊल उचलले आहे. कोम येथील पवित्र जामकरन मशिदीवर सूडाचा लाल झेंडाफडकवण्यात आला आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणने आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर डझनभर मिसाईल डागली आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया, कतार आणि ओमानमधील अमेरिकन तळांवर तणाव वाढला आहे.

इराणमध्ये आणीबाणी

खामेनी आणि ४८ नेत्यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये सध्या पूर्णपणे गोंधळाची स्थिती असून तेथे ४० दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या युद्धाचा भडका उडाल्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. दुसरीकडे, बेंजामिन नेतन्याहू यांनी, जोपर्यंत इराणचे संपूर्ण लष्करी जाळे उखडले जात नाही, तोपर्यंत हे हल्ले थांबणार नाहीत, असा इशारा दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran's backbone broken; 48 leaders killed in 'Operation Lions Roar'

Web Summary : US-Israeli operation 'Lions Roar' severely hits Iran after Khamenei's death. Trump reports 48 Iranian leaders killed. Iran retaliates with missile strikes, raising tensions in Gulf states. Iran declares national mourning as global oil prices may rise.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAyatollah Ali Khameneiअयातुल्ला अली खामेनेईIranइराणAmericaअमेरिका