शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांना देहव्यापारात ओढणा-या नराधमाला न्यायालयाने सुनावली 472 वर्षांची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 13:50 IST

31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनला लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपाखाली अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे

ठळक मुद्देअमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने सुनावली 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनवर लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपब्रॉक फेंकलिनने फेसबूकच्या माध्यमातून अनेक महिला आणि तरुणींचा भरती केली होती

वॉशिंग्टन - अमेरिकेमधील कोलोराडामधील न्यायालयाने एका व्यक्तीला 472 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 31 वर्षीय ब्रॉक फेंकलिनला लहान मुलं आणि महिलांची फसवणूक करुन देहव्यापारात ओढल्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्रॉक फेंकलिनला आपलं संपुर्ण आयुष्य आता कारागृहात घालवावं लागणार आहे. ब्रॉक फेंकलिन हा एकटा नव्हता, तर त्याची एक टोळीच होती. हे सर्वजण मिळून लहान मुलं आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम करत असे. ब्रॉक फेंकलिनने फेसबूकच्या माध्यमातून अनेक महिला आणि तरुणींचा भरती केली होती. ब्रॉक फेंकलिन मानवी तस्करी, लैंगिक शोषण, बाल वेश्याव्यवसाय आणि अपहरणासहित 30 प्रकरणांमध्ये दोषी आढळला आहे. फिर्यादी पक्षाने न्यायालयाने दिलेल्या शिक्षेचं समर्थन करताना सांगितलं आहे की, हा एक प्रकारचा संदेश आहे. जर कोणी अशा प्रकारचा गुन्हा करत असेल तर त्याच्याविरोधात इतकीच कठोर कारवाई करण्यात येईल असा संदेश यामुळे लोकांपर्यंत पोहोचला आहे. 

'देशात अशाप्रकारचा गुन्हा केल्यास सहन केला जाणार नाही असा संदेश न्यायालयाच्या निर्णयामुळे मिळाला आहे. मानवी तस्करीसाठी अमेरिकेच्या इतिहासात इतकी कठोर शिक्षा आजपर्यंत देण्यात आलेली नाही', असं कोलोराडे अॅटर्नी जनरल कार्यालय प्रवक्ता जेनेट ड्रेक यांनी सांगितलं आहे. 

ब्रॉक फेंकलिन फेसबूकच्या माध्यमातून महिला आणि तरुणींची भरती करत होता. त्यांना अंमली पदार्थांचं व्यसन लावलं जायचं आणि नंतर मग त्यांचा सौदा केला जात असे. एका पीडितेने दिलेल्या जबाबानुसार, आपल्यासोबत काय काय झालं हे शब्दांत सांगू शकत नाही इतकं भयानक आहे. ब्रॉक फेंकलिनच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण कारागृहामागे गेला पाहिजे अशी इच्छाही तिने व्यक्त केली आहे. 

ब्रॉक फेंकलिनच्या टोळीत एकूण सातजण होते, ज्यामधील चौघांना आधीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमेरिकेत गेल्या एक दशकात 22 हजाराहून जास्त मानवी तस्करीची प्रकरणं नोंद झाली आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिलेल्या अहवालानुसार, जगभरात चार कोटींहून जास्त लोक मानवी तस्करी पीडित आहेत. यामधील 40 लाख लोकांना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आलं. 

टॅग्स :jailतुरुंगCourtन्यायालय