जगातील पहिली हत्या ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी

By Admin | Updated: May 30, 2015 00:07 IST2015-05-30T00:07:35+5:302015-05-30T00:07:35+5:30

स्पेनमध्ये संशोधकांना ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीची कवटी सापडली असून, त्यावरून जगातील सर्वात पहिली हत्या केव्हा झाली असावी याचे रहस्य उकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

4,30,000 years ago in the world's first murder | जगातील पहिली हत्या ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी

जगातील पहिली हत्या ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वी

लंडन : स्पेनमध्ये संशोधकांना ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीची कवटी सापडली असून, त्यावरून जगातील सर्वात पहिली हत्या केव्हा झाली असावी याचे रहस्य उकलण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कवटीवर घावाची चिन्हे असून, त्यामुळे पुरातात्विक नोंदीत पहिल्या अंत्यविधी प्रथेसंबंधीही पुरावा मिळू शकतो. या संशोधनात बिग्मंटन विद्यापीठाचे मानवतज्ज्ञ राल्फ क्वाम यांचाही सहभाग होता. स्पेनमधील लोस हुएसोस येथे हे संशोधन झाले. ही जागा ‘हाडांचा खड्डा’ नावाने ओळखली जाते. लोस येथे जमिनीखाली असणाऱ्या गुहेत अशा २८ लोकांचे अवशेष मिळाले असून, ते सर्व ४ लाख ३० हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या गुहेत जाण्याचा मार्ग अत्यंत कठीण असून हे मृतदेह तिथे कसे आणले जात असावेत हेही एक आश्चर्यच आहे. (वृत्तसंस्था)

कवटीवर आघाताचे व्रण
४या माणसाला झालेल्या जखमा अपघात किंवा शिकारीदरम्यान झाल्या असाव्यात किंवा समोरून कोणी हल्ला केला असावा. कवटीवर आघाताचे व्रण तसेच आहेत, म्हणजे या माणसाचा लगेच मृत्यू झाला.
४या कवटीचा मालक व इतर मृतदेह ज्यांचे आहेत ती माणसे आधुनिक माणसासारखी नव्हती. होमो हायडेलबर्जेनिस या नावाने ओळखला जाणारा तो माणसाआधीचा टप्पा होता. हे लोक युरोप, आफ्रिका व आशियात ७ लाख ते २ लाख वर्षांपूर्वी फिरत असत.

Web Title: 4,30,000 years ago in the world's first murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.