सीरियामध्ये बॉम्बस्फोट, 43 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: January 8, 2017 07:40 IST2017-01-08T07:40:24+5:302017-01-08T07:40:24+5:30

सीरियामध्ये तुर्कीच्या सीमेजवळ बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या एजाज शहरात शनिवारी भीषण बॉम्बस्फोट

43 killed in Syria bomb blasts | सीरियामध्ये बॉम्बस्फोट, 43 जणांचा मृत्यू

सीरियामध्ये बॉम्बस्फोट, 43 जणांचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
 
बेरूत, दि. 8 - सीरियामध्ये तुर्कीच्या सीमेजवळ बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या एजाज शहरात शनिवारी भीषण  बॉम्बस्फोट झाला.   एका ट्रकमध्ये हा बॉम्बस्फोट झाला, यामध्ये  जवळपास 43 जणांचा मृत्यू  तर अनेक जण जखमी आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, एका न्यायालयासमोर असलेल्या बाजारात हा स्फोट झाला. उत्तरी अलेप्पोमधील या शहरावरील हा सर्वात भीषण हल्ला आहे.  या स्फोटात काही बंडखोरांचा देखील मृत्यू झाला आहे मात्र, मृतांमध्ये सर्वसामान्य नागरिकांची संख्या जास्त आहे. हा स्फोट इतका भीषण होता की मृतांची ओळख पटवणंही ही कठीण जात आहे. अजूनपर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. 

Web Title: 43 killed in Syria bomb blasts