बस-ट्रकच्या भीषण अपघातात ४२ जणांचा मृत्यु
By Admin | Updated: October 23, 2015 18:39 IST2015-10-23T16:59:19+5:302015-10-23T18:39:13+5:30
दक्षिण फ्रांस मध्ये बस आणि ट्रक मध्ये झालेल्या भीषण आपघात ४२ जणांचा मृत्यु झाला असून, ८ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

बस-ट्रकच्या भीषण अपघातात ४२ जणांचा मृत्यु
ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि.२३ - दक्षिण फ्रांस मध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४२ जणांचा मृत्यु झाला असून, ८ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. आज सकाळी दक्षिणी फ्रांसच्या बॉरडो शहरापासून ५७ किमी वर ट्रक आणि बस यांच्यात टक्कर झाल्यामुळे बसला आग लागली, बसमध्ये एकूण ५० प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ४२ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बाकीचे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. जखमीना जवळील रुग्णालयात नेले आहे.
स्थानिक वृतपत्राच्या माहिती नुसार बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जास्तीत जास्त प्रवासी वयोवृद्ध होते. फ्रांसचे राष्ट्रपती फ्रँक होलांद सध्या अथेन्स च्या दैऱ्यावर आहेत, या गंभीर दुर्घटनेवर त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
अपघातातील सर्व मृत नागरीक हे फ्रांसचेच आहेत आसे फ्रांसच्या गृह मंत्रालयच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.